- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नवी दिल्ली :-दिल्लीच्या ७० विधानसभा जागांसाठी निवडणुकांचे निकाल काल शनिवारी ८ फेब्रुवारीला जाहीर झाले.निकालात भाजपने जोरदार मुसंडी मारत विधानसभेच्या ७० जागांपैकी ४८ जागांवर विजय मिळवित तब्बल २७ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर दिल्लीच्या सत्तेच्या एकहाथी चाव्या आपल्याकडे ठेवत आम आदमी पक्षाला बाहेर केले आहे.त्यातच
आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे तीन वेळा मुख्यमंत्री असलेले अरविंद केजरीवाल यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.भाजपने ‘आप’चा ‘दारू’ण पराभव करीत दिल्ली केजरीवालमुक्त केली.मोठ्या अपयशानंतर आता दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी मार्लेना यांनी आज,रविवार ९ फेब्रुवारीला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.यानंतर नायब राज्यपाल व्ही. के.सक्सेना यांनी सातवी विधानसभाही बरखास्त केली आहे.दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी मार्लेना या कालकाजी मतदारसंघातून विजयी झाल्या असून आम आदमी पक्षाकडे बहुमत नसल्यामुळे अतिशी यांनी आज रविवारी नायब राज्यपाल व्ही.के.सक्सेना यांच्याकडे आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपुर्द केला.अतिशी यांनी २१ सप्टेंबर,२०२४ रोजी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला होता. त्या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री होत्या.दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने ७० पैकी ४८ जागांवर विजय मिळवला तर आम आदमी पक्षाने २२ जागा मिळवल्या.त्यातच काँग्रेस पक्षाला एकही जागा मिळवता आली नाही.
- Advertisement -