Tuesday, September 8, 2026
Homeदेसाईगंजअखेर 'त्या' अनोळखी व्यक्तीची ओळख पटली... - देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपुर-उसेगाव शेतशिवारात गळफास...

अखेर ‘त्या’ अनोळखी व्यक्तीची ओळख पटली… – देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपुर-उसेगाव शेतशिवारात गळफास घेऊन केली होती आत्महत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपुर-उसेगाव शेतशिवारातील कुसुम येलतुरे यांच्या शेताजवळ एका अज्ञात इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल,शनिवारी १९ ऑक्टोंबरच्या दुपारी उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
सध्या धान कापणीचा हंगाम सुरू असल्याने परिसरातील शेतकरी शेत बांधावर गेले होते.अशातच काही शेतकऱ्यांना एक अज्ञात इसम शिवराजपुर-उसेगाव शेतशिवारातील कुसुम येलतुरे यांच्या शेताजवळील एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला.काहींनी जवळ जाऊन बघितले असता,अनोळखी इसमाने दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली असल्याचे लक्षात आले.लगेच नागरिकांनी याबाबत देसाईगंज पोलीस ठाण्याला माहिती दिली.देसाईगंज पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.रात्री पर्यंत इसमाची ओळख पटलेली नसल्याने देसाईगंज पोलिसांपुढे मोठे आवाहन होते. त्यानुसार ठाणेदार अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक माने,बिट अंमलदार मदन मडावी व सहकारी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत अखेर आज,रविवारी २० ऑक्टोंबरला अनोळखी इसमाची ओळख पटली.
विकास अशोक गुरूनुले वय २८ वर्षे रा.सरडपार, ता.सिंदेवाही,जि.चंद्रपूर असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.विकास हा आरमोरी तालुक्याच्या रामाळा येथील सासुरवाडीला आला होता.त्याची पत्नी बाहेरगावी कामाला गेली होती. अशातच त्याने काल,शनिवारी १९ सप्टेंबरच्या दुपारी गळफास कां घेतला? हे अद्यापही गुलदस्त्यात असून पुढील तपास कुरुड-कोंढाळा बिट अंमलदार मदन मडावी हे करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू,तर सात जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा परिसरात एका भरधाव ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार...

शासकीय शुल्काव्यतिरिक अतिरिक्त रकमेची मागणी; केवळ १५० रुपये घेतांना सेतू केंद्र चालकाला रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागरिकांना वेळेत व तात्काळ शासकीय प्रमाणपत्रे मिळावीत,यासाठी ऑनलाईन सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.मात्र,काही सेतू केंद्र चालक मनमानी कारभार करून शासकीय...

गावाजवळच दर्जेदार शिक्षण; चार शाळा बनणार ‘मॉडेल शाळा’..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासीबहुल आणि दुर्गम एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांना गावाजवळच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील चार शाळा ‘मॉडेल शाळा’...

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!