Tuesday, August 18, 2026
Homeकुरखेडाअखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.अश्यातच आज,गुरुवार ३० एप्रील रोजी कुरखेडा नगरपंचायत पदाधिकाऱ्यांनी शिष्टाई करीत प्रशासनाशी कामगारांची चर्चा घडवून आणली व चर्चेअंती त्यांचे थकीत वेतन अदा करीत या प्रश्नावर तोडगा काढला. त्यामुळे,संपावर असलेले कामगार उद्या शुक्रवारपासून पूर्ववत कामावर रूजू होतील,अशी माहिती नगराध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी दिली.
कुरखेडा शहराच्या स्वच्छतेचे कंत्राट शहरातीलच एका बचत गटाला देण्यात आले आहे.मात्र,सदर कंत्राट प्रक्रिया राबवितांना काही तांत्रिक अडचणींमुळे मागील दोन महिण्याचे बिल थकीत होते.त्यामुळे कामगारांना वेतन अदा करता आले नाही.परिणामी कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारले होते.आंदोलन सुरू झाले त्याचवेळी एका महिण्याचे वेतन अदा करीत कामगारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.मात्र,कामगारांचे समाधान न झाल्याने हा आंदोलन तिव्र झाला.काल बुधवारी आंदोलकांची आझाद समाज पक्षाचे राज बन्सोड,माकपाचे अमोल मारकवार व आपचे नासिर हाश्मी यांनी भेट घेत नगर पंचायत पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती.अखेर आज नगराध्यक्ष अनिता बोरकर, उपाध्यक्ष बबलू हूसैनी,आरोग्य सभापती सागर निरंकारी, महिला व बालकल्याण सभापती कांताबाई मठ्ठे, नगरसेवक जयेंद्र चंदेल,आशाताई तूलावी,हेमलता नंदेश्वर, अतूल झोळे यांनी शिष्टाई करीत प्रशासनाशी कामगारांची चर्चा घडवून आणली.यावेळी थकीत एका महिन्याचे वेतन त्यांना तात्काळ अदा करण्यात आले.त्यामुळे कामगारांनी संप मागे घेतला व उद्यापासून सर्व कामगार कामावर रूजू होणार असल्याची माहिती नगर पंचायत पदाधिकाऱ्यांनी दिली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल; पोलिस यंत्रणा सतर्क.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपुरातील नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल आज,मंगळवार १८ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास शाळांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर दिसून येताच शिक्षण...

जिल्हाधिकारी व एसपी रात्रीच पोहचले मार्कंडा देवस्थान परिसरात; विकास व संवर्धन कामांची केली पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देवस्थान परिसरात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी)आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग(एएसआय) यांच्यामार्फत सुरू असलेल्या कामांची जिल्हाधिकारी...

सट्टा-पट्टीचे आकडे घेणारा ताब्यात..!

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-ब्रम्हपुरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैधरीत्या सट्टा-पट्टीचे आकडे घेणाऱ्यास ताब्यात घेत त्याच्याकडून २ हजार १५० रुपयांची रोख,सट्टा-पट्टीचे आकडे लिहिलेली चिठ्ठी,बॉलपेन व रायटिंग...

आता गडचिरोलीत होणार विभागीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन स्थानिक मच्छीमार, मत्स्यकास्तकार,आदिवासी बांधव आणि बेरोजगार युवकांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने गडचिरोली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!