उद्रेक न्युज वृत्त :-दिल्लीचे रहिवासी असलेल्या याचिकाकर्त्या नमह यांनी संविधानाच्या कलम १ मध्ये दुरुस्तीची मागणी केली आहे.ते म्हणतात की, संविधानातील ‘इंडिया जो भारत आहे’ ही ओळ ‘भारत किंवा हिंदुस्थान राज्यांचा संघ’ अशी बदलली पाहिजे.त्यानुसार आज,बुधवारी १२ मार्चला याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.दिल्ली उच्च न्यायालयाने सदरचा खटला निकाली काढत न्यायालयाने याचिकाकर्त्याला गृह मंत्रालयाकडे अर्ज दाखल करण्यास सांगितले आहे. यासोबतच,न्यायालयाने गृह मंत्रालयाला या निवेदनावर लवकरात-लवकर निर्णय घेण्यास सांगितले.केंद्र सरकारच्या वकिलांनी सांगितले की, याचिकाकर्त्याने गृह मंत्रालयाला पक्षकार बनवलेले नाही,तर अशा प्रकरणात निर्णय गृह मंत्रालयाने घ्यावा लागतो.याचिकेत सरकारला संविधानात सुधारणा करण्याचे आणि इंडिया या शब्दाऐवजी ‘भारत’ किंवा ‘हिंदुस्तान’ हा शब्द वापरण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली होती.
अखेर ‘इंडिया’ शब्दाऐवजी ‘भारत’ शब्द वापरण्यावरील सुनावणी निकाली..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक


सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES