Friday, September 4, 2026
Homeगडचिरोलीवडसा-कुरखेडा-कोरची राज्य महामार्गासाठी ९४.९१ कोटी निधी मंजूर.. - आमदार रामदास मसरामांच्या पाठपुराव्याला...

वडसा-कुरखेडा-कोरची राज्य महामार्गासाठी ९४.९१ कोटी निधी मंजूर.. – आमदार रामदास मसरामांच्या पाठपुराव्याला यश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेत वडसा-कुरखेडा-कोरची ते राज्य
महामार्ग रस्त्याची दुरावस्था झाल्याने यासाठी महामार्गाच्या निधीच्या प्रस्तावास लवकर मंजुरी द्यावी व सदर महामार्गाचे काम तात्काळ सुरू करावे; अशी मागणी केली होती.त्यानुसार सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांनी तात्काळ मागणी पूर्ण करत या महामार्गासाठी ९४ कोटी ९१ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असल्याने आमदार रामदास मसरामांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
आमदार मसराम यांनी सर्वप्रथम त्या-त्या तालुक्यात दौरे करून जनतेशी थेट संपर्क साधून समस्या जाणून घेतल्या होत्या.महामार्गावरील रस्त्यांची बऱ्याच कालावधीपासून दुरावस्था झालेली होती.अशातच वडसा-कुरखेडा-कोरची ते राज्य सीमा-राज्यमार्ग ३१४ हा महामार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे.सद्या स्थितीत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतांनाच मसराम यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यालयात जाऊन महामार्गाची व्यथा मांडली होती.त्यानुसार भोसले यांनी राज्यमार्ग ३१४ महामार्गावरील रस्त्याचे मजबुतीकरण कि.मी.१३२/२०० ते १४४/४०० (ता.कोरची) या करीता ९४ कोटी ९१ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.रस्ता चौपदरीकरणामुळे रस्त्यावरील वाहनांची गर्दी कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे.तसेच महामार्गावरून कृषी माल व व्यावसायिक माल वाहतूक करणे सोपे होणार आहे.महामार्गाचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे आमदार मसराम यांनी स्पष्ट केले असल्याने परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!