Monday, July 13, 2026
Homeदेसाईगंजअखेर अपघातातील गंभीर जखमी पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू..

अखेर अपघातातील गंभीर जखमी पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कुरूड-कोंढाळा बिटातील संतोष रमेश मरसकोल्हे वय ५६ वर्षे, रा.आरमोरी,जि.गडचिरोली यांचा शनिवार ४ जुलै २०२६ रोजीच्या पहाटे देसाईगंजवरून दुचाकीने आरमोरीकडे परत जात असतांना त्यांच्या दुचाकीला रानडुकराने दिलेल्या धडकेने अपघात झाला होता.अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर नागपूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.अश्यातच नागपूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतांनाच काल मंगळवारच्या रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
संतोष मरसकोल्हे हे देसाईगंज पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक(पीएसआय)पदावर कार्यरत होते.देसाईगंज ठाण्यांतर्गत येणाऱ्या कुरूड,कोंढाळा,शिवराजपुर, उसेगाव,तुळशी व कोकडी इत्यादी गावांचा कारभार त्यांच्याकडे देण्यात आला होता.घटनेच्या दिवशी मरसकोल्हे हे देसाईगंज पोलीस ठाण्यातील शुक्रवारची रात्रपाळी संपवून शनिवार ४ जुलैच्या पहाटे देसाईगंजवरून दुचाकीने आरमोरीकडे परत जात होते. दरम्यान,आरमोरी मार्गावर अचानकपणे समोर आलेल्या रानडुकराने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक बसताच मरसकोल्हे हे डोक्याच्या भारावर खाली कोसळले.यात डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना तात्काळ ब्रम्हपुरीच्या आस्था रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र,प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूरला हलविण्यात आले होते.तिथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असतांनाच त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या अचानकपणे जाण्याने कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला असून देसाईगंज प्रशासनातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!