उद्रेक न्युज वृत्त
नितेश केराम/कोरपना ता.प्र.
कोरपना :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून कोरपना तालुक्यातील शेरज बुज येथील धोबी परीट व वरीट जिल्हाध्यक्ष चंद्रपूर विश्वनाथ मुके यांना १४ एप्रिल २०२३ रोजी अखिल भारतीय धोबी महासंघ आयोजित कार्यक्रमात राष्टीय समाज भूषण पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.
विश्वनाथ मुके यांनी सामाजिक क्षेत्रात व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली असल्याने सदर कार्याची दखल घेत अखिल भारतीय धोबी महासंघाच्या वतीने राष्टीय समाज भूषण पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.मुके यांना राष्टीय समाज भूषण पुरस्कार प्राप्त झाल्याने कोरपना तालुक्यातील सर्व धोबी परीट व वरीट समाज बांधवाकडून व अंधश्रद्धा निर्मूलन शाखा कोरपणा यांच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.