Tuesday, May 26, 2026
Homeगडचिरोलीअकरावी ऑनलाईन प्रवेशाने विद्यार्थ्यांची वाढली डोकेदुखी..

अकरावी ऑनलाईन प्रवेशाने विद्यार्थ्यांची वाढली डोकेदुखी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-यंदाच्या शैक्षणिक वर्षात अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी संभ्रमात आहेत.अनेक विद्यार्थी कसे करायचे,या विचारात पडले असून डोकेदुखी वाढली आहे.अश्यातच अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाबाबतची माहिती बहुतांश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माहीतच नाही.परिणामी दहा दिवसांत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करताना कनिष्ठ महाविद्यालयांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.प्रवेश प्रक्रिया २१ मे २०२५ पासून सुरू होणार असतांनाही दहावीचे गुणपत्रक,शाळा सोडल्याचा दाखलाच मिळाला नसल्याचे वास्तव आहे.त्यामुळे प्रवेश मिळणार की नाही,अशी भीती विद्यार्थ्यांना भेडसावत आहे.दहा दिवस चालणाऱ्या या प्रवेश प्रक्रियामध्ये दोन दिवस फक्त सराव सत्र आहे.त्यानंतर २१ मेपासून २८ मेपर्यंत प्रवेश प्रक्रिया चालणार आहे.या दरम्यान प्रत्यक्ष नोंदणी आणि पसंती नोंदविणे गरजेचे आहे. त्यात व्यवस्थापन कोटा,इन हाऊस आणि अल्पसंख्यांक अर्ज करून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर नोंदणी होणार नाही.३० मे २०२५ ला तात्पुरती गुणवत्ता यादी प्रकाशित होणार असून १ ते ४ जूनपर्यंत हरकती आणि दुरुस्ती प्रक्रिया चालणार आहे.३ जूनला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार असून ५ जूनला गुणवत्ता यादीवर आधारित प्रवेश होणार आहेत.६ जूनला वाटप केलेल्या महाविद्यालयांची यादी पोर्टलवर जाहीर होणार आणि ६ ते १२ जूनपर्यंत आवश्यक कागदपत्र अपलोड करणे व प्रत्यक्ष तपासणी होणार आहे तर १४ जूनला दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा यादी जाहीर होणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोबाईलवर अचानक आलेल्या अलर्टने खळबळ.. – पुढील २४ तासांत पाच जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नुकताच काही वेळापूर्वी अनेक नागरिकांच्या मोबाईलवर अचानकपणे "Extremely Severe Alert" म्हणून संदेश प्राप्त होताच एकच खळबळ उडाली.विशेष म्हणजे,सदरचा संदेश हा अत्यंत गंभीर...

येत्या सोमवारी होणारी लोकशाही दिन सभा रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात येणार होते.जिल्ह्यातील नागरिकांनी...

दोन चिमुकल्या मुलींवर अल्पवयीन मुलाचा अत्याचार..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यात दोन अल्पवयीन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे.या प्रकरणी अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी तात्काळ...

नागपुरात वाहनांच्या चोऱ्या करायचे अन् लाखनीत विकायचे; तिघांना बेड्या..

उद्रेक न्युज  नागपूर :-भंडारा जिल्ह्याच्या लाखनी परिसरात कार्यरत असलेल्या सराईत वाहन चोरांच्या टोळीचा नागपूर गुन्हे शाखा युनिट-एकच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!