- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-पैसा अन् संपत्तीची लालच कुठल्या स्तरापर्यंत पोहचेल,हे सांगताच येत नाही.चक्क पोटच्या पोराने कागदोपत्री घोडे गोळा करून जिवंत आईला मयत दाखवून कागदोपत्री ‘गेम’ केला असल्याची घटना नुकतीच उमरेड तालुक्याच्या गांगापूर येथे उघडकीस आली आहे.मुलाने स्वतःच्या आईला मयत दाखविल्याने मी मयत नाही.जिवंत आहे,असे तिला ठणकावून सांगावे लागत आहे.
माधुरी जगदिश पाली ऊर्फ माधुरी अशोक धांडे असे तक्रारकर्त्या आईचे नाव आहे.मुलगा साहील अशोक धांडे याने आपल्या आईच्या मृत्यूचे खोटे प्रमाणपत्र आणि शपथपत्र तयार करत हा घोळ केल्याची तक्रार आई माधुरी पाली धांडे हिने केली आहे.सुमारे चार महिन्यांपासून संबंधित कार्यालयाकडे तक्रारकर्ती आई हेलपाटे मारत आहे.या अतिशय गंभीर प्रकरणाकडे कुणीही लक्षच देत नाही,अशी वेदना तिने मांडली. याप्रकरणी तातडीने कारवाई करावी,अशी मागणी माधुरी पाली-धांडे यांनी केली आहे.माधुरी यांच्या पहिल्या पतीचे नाव अशोक धांडे होते. माधुरी आणि अशोक हे सन २०००ला विवाह बंधनात अडकले. दोघांनीही सुखी संसाराची स्वप्ने रंगविली. साहील नावाचे अपत्य जन्माला आले.आनंदी जीवनप्रवास सुरू असतांनाच अवघ्या दोन वर्षातच माधुरीचा संसार उद्ध्वस्त झाला.सन २००२ ला माधुरीचे पती अशोक धांडे यांचे आजाराने निधन झाले.त्यानंतर माधुरी हिने नरसाळा,नागपूर येथील जगदिश पाली यांच्याशी सन २०१२ ला विवाह केला.इकडे मुलगा साहिल हा आपल्या आजी-आजोबांकडेच उमरेड गांगापूर येथे लहानाचा मोठा झाला.उमरेड गांगापूर येथे माधुरी अशोक धांडे या नावाने प.ह.नं. २१,गट नं. ४/५/१०/ब प्लॉट होता.आई माधुरी ही नागपूरला वास्तव्यास होती.आईला विश्वासात न घेता साहिलने आपली शक्कल लढविली.११ जुलै २०२३ ला माधुरी अशोक धांडे मयत झाली असा अर्ज सादर केला.मृत्यूचा पुरावा म्हणून नागपूर महानगरपालिकेचे मृत्यू प्रमाणपत्रही जोडले.शासकीय यंत्रणेचे कागदोपत्री घोडे धावू लागले.माधुरी अशोक धांडे या मृत झाल्याचे कारण दाखवून प्लॉटच्या सातबारावरून माधुरी धांडे यांचे नाव वगळण्यात आले.२१ नोव्हेंबर २०२३ ला झालेल्या फेरफारमध्ये वारसाने म्हणून साहील अशोक धांडे याचे नाव चढविण्यात आले.आईचा मृत्यू झाल्याचा प्रतिज्ञालेख सुद्धा साहिलने लिहून दिला आहे.मृत्यूचे खोटे प्रमाणपत्र आणि शपथपत्र या आधारावर ठराव क्रमांक-१०४ प्रमाणे वारस नोंद घेतल्या गेल्या.साहिल धांडे याचे नाव नवीन फेरफार करत सातबारावर दाखल करण्यात आले. प्रतिज्ञालेखात लिहून देत असतांना,काहीही खोटे आढळून आल्यास भारतीय दंडसंहिता १९६० चे कलम १९३/२,१९९,२०० या तरतुदीनुसार होणाऱ्या कायदेशीर कारवाईस पात्र राहील,अशीही बाब साहिलच्या स्वाक्षरीसह नमूद आहे.यामुळे या फसवणुकीच्या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष द्यावे,अशी मागणी केली जात आहे.
माधुरी धांडे-पाली,हल्ली मुक्काम-नरसाळा,नागपूर👇
मागील चार महिन्यांपासून मी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारत आहे.पोलिस ठाण्यातसुद्धा तक्रार दिली आहे.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा.योग्य कारवाई करावी.माझ्या प्लॉटचे कागदपत्रे सुद्धा मला दिले गेले नाहीत.मला न्याय पाहिजे.मी मेलेली नाही. जिवंत आहे.
- Advertisement -

