Monday, September 21, 2026
Homeनाशिक४ वर्षीय मुलगी खेळत होती अंगणात; बिबट्या आला अन् चीमुकलीला घेऊन गेला-...

४ वर्षीय मुलगी खेळत होती अंगणात; बिबट्या आला अन् चीमुकलीला घेऊन गेला- काही अंतरावर आढळून आला चिमुकलीचा मृतदेह

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नाशिक :- जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्राम्हणवाडे गावातील मळे परिसरात संध्याकाळच्या सुमारास ४ वर्षीय मुलगी घराजवळच्या परिसरात खेळत होती.अंधार असल्याचा फायदा घेत बिबट्याने  ४ वर्षीय चिमुकलीवर झडप घालून तिला आपल्या जबड्यात धरून फरफटत जंगलाच्या दिशेने नेले. ही बाब स्थानिक रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा करून गावकऱ्यांना माहिती दिली. तसेच,घटनेची माहिती तात्काळ वनविभागाला देण्यात आली.माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.वनरक्षक,वन मजुरांसह गावकऱ्यांचे शोध कार्य सुरू असतांना काही अंतरावर मुलीचा मृतदेह आढळून आला.सदर घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

ब्राम्हणवाडे येथील नवसू पांडू कोरडे यांची ४ वर्षांची मुलगी नयनाला बिबट्याने घराच्या अंगणातून नेले असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.सदर घटनेने नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली असून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.स्थानिक नागरिकांकडून वन विभागाला धारेवर धरत बिबट्याचा संचार वाढल्याने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!