Tuesday, July 14, 2026
Homeगोंदिया२८ वर्षीय महिलेच्या हत्या प्रकरणातील प्रकरणाचा उलगडा.. - गर्भधारणेनंतर लग्नाची मागणी करताच...

२८ वर्षीय महिलेच्या हत्या प्रकरणातील प्रकरणाचा उलगडा.. – गर्भधारणेनंतर लग्नाची मागणी करताच काढला काटा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :-एका २८ वर्षीय महिलेचा मृतदेह मंगळवार ३ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारच्या सुमारास मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या मार्गावरील तिरोडा तालुक्याच्या बोंडराणी जंगलातील पाणंद रस्त्यालगत पळसाच्या झाडाखाली संशयास्पद स्थितीत आढळून आला होता.पोलिसांच्या प्राथमिक तपासात महिलेचा खून करून मृतदेह जंगलात फेकून दिल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत महिला ज्या व्यक्तीसोबत गेली त्यानेच तिचा घात केल्याचे निष्पन्न झाल्याने दवनीवाडा व खैरलांजी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.पूनम राकेश तुमाने वय २८ वर्षे रा.खैरी,जि.बालाघाट, मध्यप्रदेश असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे,तर गावातीलच संजय तितरमारे वय ४१ वर्षे,रा.खैरी, जि.बालाघाट असे आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी दवनीवाडा पोलिसांनी आरोपी संजय तितरमारे विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१)अन्वये गुन्हा दाखल करून त्याला बुधवार ४ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.त्यानुसार, तपासात आणखी महत्त्वाच्या बाबी उघडकीस आणायच्या असल्याने दवनीवाडा पोलिसांनी कोठडीत वाढ करण्याची मागणी करताच न्यायालयाने मान्य करून आरोपीच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.तत्पूर्वी गेल्या दोन दिवसांत पोलीस तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.पूनम तुमाने हिचा पतीसोबत बऱ्याच कालावधीपासून वाद सुरू होता.त्याबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने तिला वारंवार वाराशिवनी न्यायालयात हजर राहावे लागत होते.यासाठी घराशेजारी राहणारा संजय तितरमारे हा तिला मदत करीत होता. सुनावणीसाठी वारंवार सोबत ये-जा करत असतांना दोघांमध्ये जवळीकता वाढली आणि त्यातून प्रेमसंबंध निर्माण झाले.दरम्यान,पूनम हिला संजयपासून गर्भधारणा झाली.विशेष म्हणजे मृतक पूनम ही सात महिन्यांची गर्भवती होती.गर्भधारणेनंतर पूनम ही संजयकडे लग्नाची मागणी करू लागली.मात्र,संजय आधीच विवाहित होता आणि त्याचे कौटुंबिक आयुष्य सुरळीत सुरू होते.हे प्रकरण उघडकीस आल्यास समाजात आपली बदनामी होईल व संसार उद्ध्वस्त होईल,या भीतीने संजयने पूनमचा कायमचा काटा काढण्याचा कट रचल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.२८ जानेवारी रोजी न्यायालयीन सुनावणीसाठी जात असल्याचे सांगून संजयने पूनमला तिरोडा तालुक्यातील बोंडराणी जंगल परिसरात नेले. निर्जनस्थळी नेल्यानंतर पूनमने पुन्हा लग्नाचा विषय काढून त्याच्यावर दबाव टाकला.त्यावरून दोघांमध्ये वाद झाला.संतापाच्या भरात संजयने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला.ओळख पटू नये म्हणून तिच्या डोक्यावर वारंवार घाव घालून चेहरा विद्रूप केला व मृतदेह जंगलात फेकून तो पसार झाला होता.घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून आरोपीस कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

  • आरोपीने पोलिसांना दिला होता चकमा 👇
पूनम व संजय हे दोघेही २८ जानेवारीला गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील परसवाडा टी पॉइंटवर गेले होते.तिथून पूनमने आपल्या आईला घरी येणार आहे; एवढे सांगून फोन कट केला.मात्र,रात्री उशिरापर्यंत पूनम घरी परतली नाही.संजयने पूनमच्या घरी जाऊन तुमची मुलगी माझ्यासोबत परत आली नाही.ती घरी आली कां?अशी विचारणा पूनमच्या वडिलांना केली. यानंतर ते वाराशिवनी व रामपायलीकडे पूनमचा शोध घेण्यासाठी निघाले.पण,तिचा शोध न लागल्याने बालाघाट जिल्ह्यातील खैरलांजी पोलिस स्टेशन येथे ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.यानंतर पोलिसांनी पूनमचा शोध घेण्यास सुरुवात केली. अश्यातच ३ फेब्रुवारीच्या मंगळवारी दुपारच्या सुमारास बोंडराणी जंगलाकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्यालगत पळसाच्या झाडाखाली एका महिलेचा मृतदेह चंद्रकुमार भगत या शेतकऱ्याला दिसून आला असता याची माहिती गावकरी व दवनीवाडा पोलिसांना दिली.घटनेची माहिती मिळताच दवनीवाडा पोलिस व उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बानकर,पोलिस निरीक्षक वैशाली ढाले,सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय टेकाम घटनास्थळी दाखल होत मृतदेहाचा पंचनामा करून याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.याप्रकरणात पोलिसांना सुरुवातीपासूनच संजय तितरमारे याच्यावर संशय होता आणि तो खरा ठरला.सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.मात्र,खाकीच्या धाकापायी तो नरमला आणि गुन्हा कबूल केला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

वसतिगृहातील गंभीर अनियमिततेवर आमदार मसराम संतप्त.. – आरमोरी येथील वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी शहरातील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी अचानकपणे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता वसतिगृहातील अनेक...

आज दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल होणार जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज,मंगळवार १४ जुलै रोजी...

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!