Thursday, July 9, 2026
Homeगडचिरोली२५ वर्षीय तरुणाने वडिलाची केली हत्या; आरमोरी तालुक्यातील घटना..

२५ वर्षीय तरुणाने वडिलाची केली हत्या; आरमोरी तालुक्यातील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातून एक धक्कादायक घटना आज,सोमवार १३ एप्रिल रोजी सर्वत्र उघडकीस आली.एका एकुलत्या एक २५ वर्षीय मुलाने आपल्याच वडिलाची हत्या करून वडिलाचा शोध घेण्याचे नाटक केले,पण केलेले नाटक काही काळापुरतेच राहिले आणि त्याला बेड्या पडल्याची घटना काल रविवारच्या रात्री आरमोरी तालुक्यातील पालोरा येथे घडली.देवाजी आडकू धकाते वय ६५ वर्षे, रा.ताडूरवारनगर,आरमोरी,जि.गडचिरोली असे हत्या झालेल्या वडिलाचे नाव आहे,तर योगेश देवाजी धकाते वय २५ वर्षे,असे आरोपी मुलाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.विशेष म्हणजे,आरोपी मुलाने किरकोळ कारणावरुन वडिलाची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
आरमोरी तालुक्याच्या पालोरा गावाजवळ धकाते कुटुंबाची वीटभट्टी असल्याने वडील आणि मुलगा त्या ठिकाणी दिवसभर काम करायचे.देवाजी धकाते यांना पाच मुली असून सहावा मुलगा योगेश आणि एकुलता एक.पाचही मुलींचे विवाह झाले असून योगेशचाही वर्षभरापूर्वी विवाह झाला होता.योगेश लग्नानंतर आई-वडिलांसोबतच राहत होता.त्याची पत्नी गर्भवती असतांना वडील किरकोळ कारणावरुन रागवायचे. शिवाय,गर्भवती असूनही तिला काम सांगायचे,सदरची बाब योगेशला खटकत होती.यातून वडील आणि मुलात वाद व्हायचा.अश्यातच मुलगा योगेशच्या मनात वेगळीच खिचडी पकु लागली.त्यानुसार,त्याने वडिलाची हत्या करण्याचा कट रचला.काल,रविवार १२ एप्रिल रोजी अंधार पडल्यावर वीटभट्टीवरुन घरी परत येत असतांनाच वडिलांच्या आधीच योगेशने घराचा रस्ता धरला. सायंकाळी साडेसात वाजता वडील घराकडे पायी परतत होते.पालोरा गावाजवळच्या बोगद्यानजीक वडील पोहोचताच तेथे आधीच दबा धरुन बसलेल्या योगेशने त्यांच्यावर पाठीमागून कुऱ्हाडीने वार केले.यावेळी वडील मुलगी निकिताशी फोनवरुन बोलत होते,हल्ल्यानंतर मेलो रे… म्हणत ते जोरात ओरडले.तिने तातडीने शेजाऱ्यांना फोन करुन माहिती दिली.दरम्यान,इकडे वडिलांची हत्या करून रक्ताने माखलेल्या कुऱ्हाडीसह योगेशने घर गाठले.कुऱ्हाड पाण्याने धुतली आणि
आई कमलबाई,चुलतभाऊ रुपेशसोबत वडिलांना शोधण्याचे नाटक केले.अखेर बोगद्याजवळ वडिलांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळला. दरम्यान,आरमोरी ठाण्याचे पोलिस निरीक्षक कैलास गवते यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळ गाठले.यावेळी योगेशच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला आणि शेवटी वडिलाच्या हत्येची कबुली दिली.त्यानुसार,पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदवला.
कित्येकजण वंशाचा दिवा म्हणून मुलासाठी देवाकडे साकडे घालतात.यासाठी वाट्टेल ते करायला तयार असतात.पण,तोच मुलगा एखाद्या जन्मदात्या वडिलांची हत्या करत असेल तर..’मुलापेक्षा मुलगी बरी,प्रकाश देते दोन्ही घरी’ असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा वावर.. – रील आणि फोटोंच्या नादात जीव धोक्यात घालू नका-उपवनसंरक्षक गडचिरोली

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली वनविभागात,विशेषतः गडचिरोली वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा वावर आहे.मनुष्य आणि हत्ती यांच्यात कोणताही अनुचित प्रकार किंवा संघर्ष होऊ नये,यासाठी...

संशय आल्याने दहा हजार घेण्यास नकार; पण तरीही गुन्हा दाखल.. -पोलीस हवालदारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दाखल गुन्ह्यातील गुन्ह्याचे स्वरूप कमी करून तपासात मदत करण्याच्या नावाखाली दहा हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविणाऱ्या एका पोलीस हवालदारावर भंडारा...

यांना म्हणतात खरे ‘लोकसेवक’..! आरोग्य उपकेंद्रात अचानकपणे मध्यरात्रीच धडकले जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कोणी कितीही मोठा अधिकारी कां असेना..! तो शासनाचा नोकर,तर जनतेचा लोकसेवक म्हणून शासनाकडून पगार घेतो.पण,काही अधिकारी स्वतःला मोठे अधिकारी समजून खुर्चीच्या...

गडचिरोली शहरासाठी २३ किलोमीटर लांबीचा चारपदरी बायपास रोड प्रस्तावित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीतील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शहरातील जड वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!