Thursday, October 22, 2026
Homeगडचिरोली१२ प्रकारच्या ओळखपत्रापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरीत करता येणार मतदान...

१२ प्रकारच्या ओळखपत्रापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरीत करता येणार मतदान…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-विधानसभा निवडणूकीसाठी येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार असून मतदान करण्यासाठी,ज्या मतदारांचे मतदार यादीत नाव आहे, अशा मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.१२ प्रकारच्या ओळखपत्रापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येणार आहे,अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ज्या मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आहे,ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील.जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत; अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्रा व्यतिरिक्त १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे.
मतदानावेळी मतदारांना दिलेले निवडणूक ओळखपत्र नसल्यास १२ प्रकारच्या पुराव्यांमध्ये आधार कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र,बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, कामगार मंत्रालयद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड,वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स),पॅन कार्ड,राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड,पारपत्र (पासपोर्ट), निवृत्तीवेतनाची दस्तावेज,केंद्र अथवा राज्य शासन,तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम,पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र,संसद,विधानसभा,विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र,भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र हे १२ पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.अनिवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे.
एखाद्या मतदाराने मतदार यादीतील आपल्या पत्त्यात बदल केला असेल,पण त्याला अद्याप नवे निवडणूक ओळखपत्र मिळाले नसेल तर त्यांचे पूर्वीचे निवडणूक ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल.मात्र,त्या व्यक्तीचे नाव विद्यमान पत्यासह मतदार यादीत असणे आवश्यक आहे.तसेच सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदान दिनांकाच्या किमान पाच दिवस आधी मतदान केंद्र, यादी भाग क्रमांक, मतदानाची तारीख, वेळ आदी माहितीच्या मतदार चिठ्ठ्यांचे निवडणूक कार्यालयाकडून वितरण करण्यात येत आहे. मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना मतदार माहिती – चिठ्ठी आणि निवडणूक ओळखपत्र सोबत घेऊन यावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

प्रचाराच्या तोफा थंडावल्या; उद्याला विधान परिषद निवडणूक मतदान..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा काल बुधवारच्या सायंकाळी थंडावल्या असून उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी मतदान होणार आहे.नागपूर पदवीधर...

वाघाचा हल्ला; शेतकरी गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र संपता- संपेना,असे चित्र निर्माण झाले आहे.जंगल परिसरात गेलेल्यांना वाघोबा तर सोडतच नाही.अश्यातच वाघ आता चक्क शेतावर जाणाऱ्या शेतकऱ्यांचाही...

पोलीस कर्मचाऱ्याची राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  अमरावती :-एका तरुण पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज,बुधवार २१ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास अमरावती शहरात उघडकीस...

पदवीधर मतदारसंघ निवडणूक; आता खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना चार तासांची विशेष सवलत.. -जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून निवडणूक साहित्य वाटप व्यवस्था व स्ट्राँग रूमची पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी खासगी आस्थापनांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या दोन तासांऐवजी आता चार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!