Tuesday, September 29, 2026
Homeनागपूर१ कोटींचे नकली हॉलमार्क असलेले दागिने मुंबई, पुण्यासह,नागपुरातुन जप्त...

१ कोटींचे नकली हॉलमार्क असलेले दागिने मुंबई, पुण्यासह,नागपुरातुन जप्त…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर :- सोन्याची गुणवत्ता प्रमाणित करण्यासाठी दागिन्यांवर हॉलमार्क बंधनकारक आहे. तरीदेखील राज्यात काही ठिकाणी बनावट हॉलमार्क लावून सोन्याच्या दागिन्यांची विक्री केली जात असल्याची माहिती भारतीय मानक ब्‍युरोला ( बीआयएस )  मिळाली. त्‍यानुसार ‘बीआयएस’ने नागपूर, मुंबई, पुणे, ठाणे येथे एकाचवेळी धाड टाकून कारवाई केली. यामध्ये नकली हॉलमार्कचा होलोग्राम असलेले सुमारे १ कोटी ५ लाखांचे २.७५ किलो दागिने जप्त करण्यात आले. ‘बीआयएस’ने ठरवून दिलेली गुणवत्ता आणि निकषांची पूर्तता न करताच राज्यात हॉलमार्कचा नकली होलोग्राम लावून सोन्याची दागिने विक्री करणाऱ्यांविरोधात ही मोहीम सुरु करण्यात आली आहे.कारवाई अंतर्गत सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या शुद्धता प्रमाणपत्रासाठी हॉलमार्कचे उल्लंघन करणाऱ्यांवर राज्यात कारवाई केली जात आहे. नागपूर सराफ असोसिएशनचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी ‘बीआयएस’च्या केंद्रांवर याची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. बीआयएसची गुणवत्ता तपासणी केंद्रे असतानाही नकली हॉलमार्क लागतोच कसा? मग, ही केंद्रे काय कामाची, असा सवाल रोकडे यांनी केला आहे.

भारत सरकारने दागिन्यांवर हॉलमार्कच्या नियमांमध्ये केलेली सुधारणा १ जुलै २०२१ पासून देशभर लागू केली आहे.नवीन नियमांनुसार, दागिन्यांवर हॉलमार्किंगचे एकूण ३ गुण आहेत. पूर्वी हे चार ते पाच असायचे.तीन गुणांमध्ये हॉलमार्क, शुद्धता ग्रेड आणि ६ अंकी अल्फान्यूमेरिक कोड असतात.

सोन्याच्या दागिन्यांवरील ‘एचयूआयडी’ कोड

६ अंकी अल्फान्यूमेरिक कोडला ‘एचयूआयडी’ म्हणतात.यामध्ये अक्षरे तसेच अंकांचा समावेश होतो. नवीन नियमांनुसार,देशात निर्मित प्रत्येक सोन्याच्या दागिन्यांना एक युनीक ‘एचयूआयडी’ कोड दिलेला आहे.यामुळे दागिन्यांची शुद्धता तपासण्यात मदत होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चिवडा खाल्ल्यानंतर सात जणांना विषबाधा..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या वरोरा शहरातून आज,सोमवार २८ सप्टेंबरच्या दुपारी एक धक्कादायक घटना समोर आली. एका चिवडा सेंटरमधील चिवडा खाल्ल्यानंतर तब्बल सात जणांना विषबाधा...

माहिती अधिकार अर्जांवर निर्धारित मुदतीत व कायद्यातील तरतुदींनुसार कार्यवाही करावी- अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या माहिती अधिकार अर्जांवर निर्धारित मुदतीत व कायद्यातील तरतुदींनुसार कार्यवाही करावी,असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी केले. आंतरराष्ट्रीय माहिती...

गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश लागू; मिरवणूक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी पूर्वपरवानगी आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महापुरुषांचे पुतळे विनापरवानगी बसविणे किंवा त्यांचे अनावरण करणे तसेच इतर बाबींवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये,यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत...

सर्व शिधापत्रिकाधारकांसाठी देसाईगंज तालुक्यात ‘आधार सेवा संकल्प सेतू अभियान’.. – आज जुनी वडसा येथे विशेष शिबिराचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पुरवठा विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या वतीने देसाईगंज तालुक्यात सर्व शिधापत्रिका धारकांसाठी ‘आधार सेवा संकल्प सेतू अभियान’ सुरू करण्यात आले आहे.देसाईगंज तहसील कार्यालयाच्या तहसीलदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!