Sunday, May 31, 2026
Homeगडचिरोलीस्वामित्व योजनेअंतर्गत ड्रोन सर्वेक्षणाच्या कामाला गती; दहा गावांचे ड्रोन सर्वेक्षण पूर्ण..

स्वामित्व योजनेअंतर्गत ड्रोन सर्वेक्षणाच्या कामाला गती; दहा गावांचे ड्रोन सर्वेक्षण पूर्ण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात स्वामित्व योजनेअंतर्गत ड्रोन सर्वेक्षणाच्या कामाला गती देण्यात आली असून नुकतेच कथलासूर,भटपर, हितलवारा, जुव्वी,दर्भा,मलेंगा,मर्दहूर,विसामुंडी,टेकला व गुंडुरवाही या दहा गावांचे ड्रोन सर्वेक्षण करण्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे.
भामरागड तालुक्यात नक्षल प्रभाव कमी झाल्याने निर्माण झालेल्या अनुकूल वातावरणाचा लाभ घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी विशेष पाठपुरावा केला.त्यांच्या व जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख विजय भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रलंबित असलेल्या गावांमध्ये ड्रोन सर्वेक्षणाची कामे भामरागड भूमी अभिलेख विभागाने पोलीस विभागाच्या सहकार्याने यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली.तसेच मौजा बिनागुंडा,दामनमर्का व कुव्वाकोडी या गावांमध्ये पोलीस सुरक्षा परवानगी प्राप्त झाल्यानंतर ड्रोन सर्वेक्षणाची कार्यवाही करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक तजवीज ठेवण्यात आली असल्याची माहिती भूमी अभिलेखचे उप अधीक्षक  विठ्ठल जाधव यांनी दिली
स्वामित्व योजनेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या जमिनीच्या सीमांचे अचूक निर्धारण होऊन मालकी हक्काची अधिकृत सनद मिळत आहे. विशेषतः नक्षल प्रभावित भामरागड तालुक्यातील काही गावे प्रलंबित होती.मात्र,सद्यस्थितीत तेथील सर्वेक्षण पूर्ण झाल्याने या गावांतील नागरिकांनाही लवकरच मालकी हक्काची सनद मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
स्वामित्व योजनेमुळे मालमत्तेच्या कायदेशीर मालकीची खात्री मिळते तसेच कर्जप्राप्तीची प्रक्रिया सुलभ होते. ड्रोन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गावठाणातील मिळकतींचे अचूक मोजमाप,नकाशे व मालमत्ता पत्रक तयार करण्यात आले असून यामुळे भविष्यातील वाद टाळण्यास मोठी मदत होणार आहे.स्वामित्व योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे जमीनसंबंधित वादांचे त्वरित निराकरण होण्यास मदत होणार असून मालमत्तेचे विभाजन अधिक सुलभ होणार आहे.अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अचूक सर्वेक्षण पूर्ण करून स्वामित्व योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून,भामरागडसारख्या दुर्गम व पूर्वी नक्षल प्रभावित भागातही विकास कामे प्राधान्याने करण्यात येत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एमडी ड्रग्सची तस्करी; आरोपीकडून साडेसात किलो ड्रग्स जप्त.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने आज,रविवार ३१ मे रोजी मोठी कारवाई करत एका तरुणास अटक करून त्याच्याकडून तब्बल ७ किलो ५०० ग्रॅम...

शेतातील विहिरीत पडून वाघाचा मृत्यू; वन विभागात खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम/सिंदेवाही(चंद्रपूर):-ब्रम्हपुरी वन विभागांतर्गत येणाऱ्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव नियतक्षेत्र अंतर्गत हजारीचक(ता.सिंदेवाही) येथील शेतातील कठडे नसलेल्या विहिरीत पडून एका प्रौढ नर वाघाचा मृत्यू...

उद्यापासून वादळी पावसाचा अंदाज; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली असून उद्या,सोमवार १ जून पासून सुरु होणाऱ्या आठवड्यातील हवामानात अजून बदल होणार आहे.हवामान खात्याने,प्रामुख्याने...

तरुणाने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका ३६ वर्षीय विवाहित तरुणाने राहत्या घरीच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना आज,रविवार ३१ मे रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा शहरातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!