- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील रहिवासी असलेल्या ५० वर्षीय पोलीस हवालदाराने स्वतःवरच गोळी झाडून आपली जीवनयात्रा संपविली असल्याची घटना काल,गुरुवारी १६ जानेवारीला दुपारच्या सुमारास दीड वाजे घडली.जयराम कारू पोरेटी वय ५० वर्षे,रा. शंभूटोला गटग्रामपंचायत मिसीपिर्री,ता.देवरी असे जीवनयात्रा संपविणाऱ्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.सदर पोलीस हवालदार पवनीधाबे येथील पोलिस सशस्त्र दूरक्षेत्र या ठिकाणी कर्तव्यावर होता.
मिळालेल्या माहितीनुसार,पवनीधाबे येथील पोलिस सशस्त्र दूरक्षेत्र या ठिकाणी जयराम पोरेटी यांची काल, गुरुवारी दुपारी १ ते २ या वेळेत कर्तव्य(ड्युटी) होती.नियमित प्रमाणे ते कर्तव्यावर हजर झाले.कर्तव्य बजावत असतांना त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या एके ४७ सर्विस रायफलने स्वतःवरच गोळी घालून जीवनयात्रा संपविली आहे.त्यांनी जीवनयात्रा कां संपविली याचा उलगडा होणे बाकी असून सदर घटनेची नोंद नवेगावबांध पोलिसांनी केली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक योगिता चाफले करीत आहेत.
- Advertisement -

