Saturday, April 18, 2026
Homeगडचिरोलीस्पर्धा पुर्व परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवांराकरीता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन..

स्पर्धा पुर्व परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवांराकरीता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-आदिवासी उमेदवांराकरीता कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता माहीती व मार्गदर्शन केंद्र गडचिरोलीच्या वतीने जिल्ह्यातील अनुसुचित जमातीच्या उमेदवांराकरीता एमपीएससी(MPSC) पुर्व प्रशिक्षण, जिल्हा निवड समीतीच्या विविध पदभरती बाबत तसेच IBPS,SSC च्या परीक्षा बाबत स्पर्धा परीक्षा पुर्व प्रशिक्षण कार्यक्रम विनामुल्य राबविण्यात येत आहे.सदर प्रशिक्षण घेऊ इच्छीणाऱ्या उमेदवांराकडे शालांत परीक्षा उतीर्ण प्रमाणपत्र व रोजगार नोदंणी कार्ड (EMPLOYMENT CARD )असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणाचा कालावधी साडेतीन महीने असून प्रशिक्षणा दरम्यान १ हजार रुपये दरमहा विदयावेतन दिले जाईल. प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या उमेदवांराना चार पुस्तकांचा संच व प्रमाणपत्र देण्यात येते.कार्यालयात अर्ज विनामुल्य उपलब्ध असून अर्ज १ मार्च २०२६ पासुन २४ मार्च २०२६ पर्यंत कार्यालयात सादर करावेत.मुलाखत ही २५ मार्च रोजी आदिवासी उमेदवांराकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहीती व मार्गदर्शन केंद्र, शासकीय संकुल बॅरेक क्र.२ गडचिरोली येथे घेण्यात येणार आहे.अधिक माहीतीसाठी ८४८५८१४४८८ (8485814488)या क्रमाकांवर संपर्क साधावा,असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!