Saturday, May 2, 2026
Homeनागपूरस्टिल प्रकल्प म्हणून गडचिरोली येणार उदयास... - नवीन वर्षात विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रिया..

स्टिल प्रकल्प म्हणून गडचिरोली येणार उदयास… – नवीन वर्षात विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रिया..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-गडचिरोली-चंद्रपूर-वर्धा-भंडारा-नागपूर या प्राधान्य क्रमाने खनिकर्म (मायनिंग) प्रकल्प हाती घेतले आहेत.यामध्ये गडचिरोलीत ५० हजार कोटींची औद्योगिक गुंतवणूक झाली असून खनिजावर आधारित प्रकल्पामुळे गडचिरोली स्टिल प्रकल्प म्हणून उदयाला येत आहे.चंद्रपूर येथे कोल गॅसिफिकेशन प्लँट करण्याचा निर्णय झाला आहे. या प्रकल्पाचा सामंजस्य करार होऊन केंद्राची मान्यता देखील मिळाली आहे.
गडचिरोली,चंद्रपूर व नागपूर येथे स्टिलवर गुंतवणूक करण्यासाठी अनेक कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. गडचिरोली समृद्धी महामार्गाशी गडचिरोली जोडत आहोत.येथील नक्षलवादाच्या समस्येशी जोरदार लढाई सुरू आहे.येत्या तीन वर्षांत गडचिरोली नक्षल्यांपासून मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.वर्षभरात १५०० युवक पोलिस दलात भरती झाले. यातील ३३ नक्षलपीडित आहेत,अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलतांना दिली आहे.भविष्यातील स्टिल सिटी म्हणून ख्यात होत असलेल्या गडचिरोली येथे नवीन वर्षात विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू होणार आहे.या विमानतळासाठीचा शासन निर्णय निघाला असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी दिली.
गडचिरोलीतील नियोजित विमानतळासाठी मौ.
मुरखळा,पुलखल,कनेरी,मुडझा (बु.), मुडझा (तु.) येथील जमीन प्रस्तावित केली आहे.या भूसंपादनासाठी गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे.महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून भूसंपादनाचा प्रस्ताव येताच कार्यवाही सुरू करण्यात येईल,असेही बिदरी यांनी म्हटले आहे.जानेवारी २०२५ मध्ये महिना अखेरीस भूसंपादन सुरू होणे अपेक्षित असल्याचे त्या म्हणाल्या.मुरखळा,पुलखल व कनेरी गावातील अंदाजे २२९.४३ हे.आर खासगी व शासकीय जमीन संपादीत करण्यात येणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!