- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-गडचिरोलीच्या महाराष्ट्र व छत्तीसगडच्या नारायणपूर सीमेलगत असलेल्या भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगल परिसरात नक्षलवादी दबा धरून बसल्याची गोपनीय माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाल्याने अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन एम.रमेश यांचे नेतृत्वात सी-६० पथकाच्या १९ तुकड्या व केंद्रीय राखीव दलाच्या जलद गती टीमच्या(QAT)दोन तुकड्या कोपर्शी जंगल परिसरात मोहीम राबविण्यास सज्ज असतांनाच दोन दिवसांपासून दक्षिण गडचिरोली भागात मुसळधार पावसामुळे मोहीम काहीकाळ थांबविण्यात आली.अश्यातच आज,बुधवार २७ ऑगस्ट रोजी नक्षलवादी व जवानांमध्ये तब्बल आठ तास चकमक उडाली.चकमकीत तीन महिला नक्षली तर एका पुरुष नक्षलवाद्यांना जवानांनी यमसदनी धाडले आहे.त्यातच घटनास्थळावरून एक एसएलआर (SLR)रायफल,दोन इन्सास (INSAS) रायफल्स आणि एक ३०३ रायफल हस्तगत करण्यात आली आहे.गडचिरोली जवानांचे पथक जंगल परिसरात पोहोचताच नक्षलवाद्यांनी पथकाच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली.गोळीबाराला प्रत्युत्तर देतांना जवांनानाही गोळीबार करावा लागला.तब्बल आठ तास चकमक सुरू होती.या अभियानात तब्बल चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली दलास यश मिळाले असून मृत नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- Advertisement -

