Monday, September 14, 2026
Homeकुरखेडासामाजिक,सहकार व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा संकल्प फाउंडेशनतर्फे गौरव..

सामाजिक,सहकार व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा संकल्प फाउंडेशनतर्फे गौरव..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या गेवर्धा येथे आज,सोमवार १४ सप्टेंबर रोजी संकल्प फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे सामाजिक,सहकार व शैक्षणिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गावातील तीन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.यावेळी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल श्रीकांत नागीलवार यांचा गौरव करण्यात आला.तर सलग सहा वेळा तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राजू बारई यांचा सूद्धा सत्कार झाला.तसेच गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाचा दर्जा व शिक्षकांच्या प्रश्नांसाठी पुढाकार घेणाऱ्या ताहीर शेख यांचाही शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती व्यंकटी नागीलवार होते.तर उद्घाटन माजी सरपंचा सुषमा मडावी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी तान्हा पोळा निमित्त आयोजित स्पर्धेत विजेते व सहभागी स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण सूद्धा करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन खुशाल रामटेके,प्रास्ताविक डॉ. जगदीश बोरकर,तर आभार मुकेश बोरकर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशासाठी संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष लोकेश ठाकरे,अतुल अंबादे,फलिंन्द्र मांडवे, भुषण बोरकर,जितेंद्र वट्टी,मुकेश बोरकर,हेमंत बोरकर, मनिष मेश्राम,गोविंद बोरकर,रवि बाळबूद्धे,विष्णू कांबळे,पंकज मैंद,बाळाजी नखाते,प्रिया बोरकर,यश मेश्राम,नितेश नखाते,मयुर चन्ने,धनू शेंडे,दुर्गेश मस्के, प्रशांत कावळे,गोपाल मडावी,देवा नाकतोडे व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.सामाजिक,सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करून समाजात सकारात्मक कार्याला प्रोत्साहन देणे हा उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे डॉ.जगदिश बोरकर यांनी सांगितले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-परंपरेचे जतन आणि पर्यावरणाचे संरक्षण यांचा समतोल साधणे ही सामूहिक जबाबदारी आहे. गणेशोत्सवाचा आनंद घेतांना पर्यावरणाची हानी होणार नाही,याची काळजी घेणे...

अतिवृष्टीग्रस्त कुटुंबीयांना १ लाख ३० हजाराची आर्थिक मदत वितरित.. -भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये यांच्या पाठपुराव्याला यश..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-अतिवृष्टीमुळे घर कोसळून नुकसान झालेले कुरखेडा शहराच्या गांधी वार्डातील ज्येष्ठ नागरिक नरेश हडप यांच्या कुटुंबाला प्रशासनाकडून १ लाख ३० हजारांची आर्थिक मदत...

अज्ञात वाहनाच्या धडकेत चितळाचा मृत्यू; तर कुंपणात अडकून बिबट्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन वन्य प्राण्यांचा मृत्यू झाल्याने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील तावशी संभाजीनगर महामार्गावर...

राज्यातील भरती परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी सूचना व अभिप्राय समितीसमोर मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी तसेच परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रभावीपणे प्रतिबंध घालण्यासाठी राज्य शासनाने उच्चस्तरीय समिती गठीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!