Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजसामाजिक वनीकरण विभागाचा 'त्यांनी' दुसरीकडे हलविला कार्यालय….-माहिती अधिकारात ३३ कोटी राज्य वृक्ष...

सामाजिक वनीकरण विभागाचा ‘त्यांनी’ दुसरीकडे हलविला कार्यालय….-माहिती अधिकारात ३३ कोटी राज्य वृक्ष लागवड योजना व हल्ली सुरू असलेल्या कामांची माहिती मागण्याचे सत्यवान रामटेके यांचे आवाहन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज(गडचिरोली) :- मागील गेली तीन वर्षा पूर्वी माहिती अधिकार कायद्या अंतर्गत मागितलेल्या माहितीचे राज्य माहिती आयुक्त खंडपीठ नागपूर, यांच्याकडून माहितीचे अवलोकन व हव्या असलेल्या माहितीच्या सत्यप्रती वित्तीय वर्ष २०१९ पासून ते आजतागायत देण्याचे आदेश मिळाले असून माहितीचे अवलोकन तसेच माहिती मागविण्यासाठी कार्यालयात जाणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्यास देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागाचे विद्यमान वन परिक्षेत्र अधिकारी टाळाटाळ करीत असल्याने कुठेतरी झांगडगुत्ता असण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने; महाराष्ट्रातील तसेच इतर परिसरातील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन ३३ कोटी राज्य वृक्ष लागवड योजना तसेच हल्ली सुरू असलेल्या वृक्ष लागवड योजनेची माहिती मागविण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते सत्यवान रामटेके यांनी केले आहे.

कुणीतरी म्हटले आहे की,चोर घोड्यांसाठी आमरण उपोषण करणे आवश्यक नाही; ते रात्रंदिवस ‘आम् भरो पोट भरो’ तसेच ‘मस्त आणि सुस्त’ जेवण करून आपल्या मरणाची वाट बघत असतात; त्यांना सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी वा सामाजिक कार्य करणाऱ्यांशी कसलेही देणे-घेणे नसते; त्यामुळे त्यांना जेव्हा शासकीय सुट्टी तसेच त्यांची कामाची जे वेळ ठरलेली असते तेव्हाच आपणही तसेच करून बेमुदत ठिय्या आंदोलन करणे आवश्यक आहे.अन्यथा तुम्ही कितीही आमरण उपोषण करा..? ते वाट लावल्याशिवाय राहणार नाहीत..? असे थोर कार्यकर्त्याचे म्हणणे आहे.व तसाच प्रकार सामाजिक कार्यकर्ते सत्यवान रामटेके यांच्या बाबतीत घडलेला दिसून आला आहे.कित्तेक वेळा आमरण उपोषणाचा इशारा देण्यासोबतच सत्यातील वाणी खरी उतरवून आमरण उपोषण केला आहे; मात्र कित्तेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे.अशातच खरे सूत्र त्यांना कळलेले असून आंदोलनाची खरी परिभाषा त्यांना सध्याच्या घडीला कळलेली आहे.त्यामुळे ३३ कोटी वृक्ष लागवड योजने अंतर्गत देसाईगंज तालुका तसेच आरमोरी तालुक्यात सर्वात जास्त कामे पूर्वी तसेच हल्ली झाली असून माहिती अधिकार कायद्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी वापर करून माहिती मागविण्यात यावी; असेही आवाहन रामटेके यांनी केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!