Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीचुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" नाट्ट्यास पुरस्कार जाहीर…..

चुडाराम बल्हारपुरे यांच्या “धरती आबा क्रांतीसुर्य बिरसा मुंडा” नाट्ट्यास पुरस्कार जाहीर…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- साहित्य नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुणे येथील साहित्य प्रज्ञामंच संस्थेतर्फे दरवर्षी उत्कृष्ट वांड्.मय स्पर्धा आयोजित करण्यात येतात.यंदा आयोजित करण्यात आलेल्या “साहित्य प्रज्ञामंच पुरस्कार- २०२३”  मध्ये झाडीपट्टीतील साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांच्या “धरती आबा-क्रांतीसुर्य बिरसा मुंडा” या नाटकास नाट्यविभागात नाट्यलेखनाचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आल्याचे “साहित्य प्रज्ञामंच च्या” अध्यक्षा  लिना देगलूरकर यांनी कळविले आहे.सदर स्पर्धेचे परिक्षक म्हणून वंदना घाणेकर व मकरंद घाणेकर यांनी काम पाहिले.

सदर पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम,सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे आहे.विशेष म्हणजे नाटकाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयोग सुरू असून नुकत्याच शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेल्या महासंस्कृती महोत्सवात १८ तारखेला या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला आहे.चुडाराम बल्हारपुरे हे झाडीपट्टीतील राज्य पुरस्कार प्राप्त नाटककार आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वांड्.मय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.आजपर्यंत त्यांची विविध १३ पुस्तके प्रकाशित झाली असून विविध स्तरावरील अनेक पुरस्काराने ते सन्मानीत आहेत.’महामृत्युंजय’, मार्कंडेश्वर,बहूढंगी समाधीवाले बाबा,स्पेशल रिपोर्ट, धरती आबा-क्रांतीसुर्य बिरसा मुंडा व गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबूराव शेडमाके ही त्यांची गाजलेली नाटके आहेत.

चुडाराम बल्हारपुरे यांच्या यशाबद्दल प्रा.अरुण बुरे, योगेश गोहणे,प्राचार्य डॉ.श्याम मोहरकर,प्रा.डॉ. जनबंधू मेश्राम,दै.लोकमतचे संजय तिपाले,दै. हितवादचे रोहिदास राऊत, दै. देशोन्नतीचे नरेश बावणे, प्रा. एस. एस. जगताप, प्रा.डॉ.माधव कांडणगीरे, प्रा. डॉ.राजकुमार मुसणे, प्रा. नवनीत देशमुख (साहित्यिक), लक्ष्मीकमल गेडाम (साहित्यिका) , मधुश्री प्रकाशनचे प्रा. पराग लोणकर (प्रकाशक) , डॉ. एस. एन.पठाण, डॉ.परशुराम खुणे,प्रमोद बोरसरे, कुसूमताई आलाम (साहित्यिका), हिरामण लांजे (साहित्यिक), प्रा. प्रब्रम्हानंद मडावी,प्रा. डॉ. बावनकुळे, पुंडलिक भांडेकर (पत्रकार) व इतर साहित्यिक मित्रांनी अभिनंदन केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!