Friday, October 16, 2026
Homeदेसाईगंजसामाजिक कार्यकर्ते खेमराज नेवारे यांनी विसोरा गावातील जाणल्या विविध समस्या....

सामाजिक कार्यकर्ते खेमराज नेवारे यांनी विसोरा गावातील जाणल्या विविध समस्या….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत गणल्या जाणाऱ्या विसोरा गावात सामाजिक कार्यकर्ते खेमराज नेवारे यांनी भेट देत गावातील नागरिकांशी हितगुज करीत गावातील विविध समस्या जाणून घेतल्या व समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्वतः पुढाकार घेणार असल्याचे उपस्थितांना आश्वासन दिले.
देसाईगंज तालुक्यातील वीसोरा गाव हे लोकसंख्येच्या मानाने मोठे तसेच धनवान व्यक्तींचे गाव म्हणून ओळखले जाते.अशातच गावात पाहिजे त्या प्रमाणात सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याने गावचा विकास अजूनही काही प्रमाणात खुंटलेला दिसून येतो.त्यामुळे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे सामाजिक कार्यकर्ते खेमराज नेवारे यांनी गावातील समस्यांसंदर्भात सदिच्छा भेट देत नागरिकांशी हितगुज साधले असता, गावातील बर्डी-विसोरा रस्त्यालगतच्या दोन्ही बाजूस चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.मुख्य चौकाचे सौंदर्यीकरण करणे आवश्यक आहे.आरोग्य सुविधांचा पुरेसा अभाव दिसून येतो.गावात शासकीय रुग्णालय उपलब्ध नसल्याने गावातील नागरिक,लहान बालके यांची गैरसोय होत आहे.गावामध्ये आरोग्यविषयक अनेक समस्या असून स्त्रियांना प्रसूतीसाठी रात्री- बेरात्री कुरखेडा,देसाईगंजसह प्रसंगी गडचिरोलीला जावे लागत असते.वेळेवर रुग्णवाहिकेची सोय नसल्याने गावकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो आहे.गावात मोठे व्यापारी,उद्योजक असून त्या मानाने गावात एकही राष्ट्रीयकृत बँक तसेच एटीएम ची सुविधा नाही; सदर गाव विविध समस्यांच्या विळख्यात सापडले असल्याने याकडे लक्ष घालून वरिष्ठ स्तरावर गाऱ्हाणे मांडून समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे खेमराज नेवारे यांनी प्रसंगी ग्रामस्थांना सांगितले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन; राज्यात ५० लाखांहून अधिक अर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेती व शेतीपूरक व्यवसायांमध्ये कार्यरत महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळवून देणाऱ्या महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अधिकाधिक महिलांनी अर्ज करावेत,असे आवाहन आंतरराष्ट्रीय...

अखेर राज्यातील सर्व ग्राम रोजगार सेवकांच्या मानधन वितरणाचा मार्ग मोकळा..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्राम पातळीवर काम करणाऱ्या ग्रामरोजगार सहायकांच्या मानधन वितरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून राज्यातील सर्व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!