- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल उद्या,गुरुवार १४ ऑगस्ट आणि १५ ऑगस्ट रोजी दोन दिवसीय गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. उद्या,१४ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव-२०२५ या कार्यक्रमास प्रशिक्षण सभागृह,कृषी चिकित्सालय, शासकीय फळ रोपवाटीका सोनापुर गडचिरोली येथे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी २.३० वाजता नगरपरिषद गडचिरोली येथे इंटरएक्टिव्ह पॅनलचे लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती.दुपारी ३ वाजता जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे जिल्हा नियोजन समितीची सभा व सायंकाळी ६ वाजता जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे पत्रकार परिषद.तसेच सायंकाळी ६.३० वाजता शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे आगमन व राखीव.दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवार,१५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वा.शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण करतील. सकाळी ९.०५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे मुख्य ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास उपस्थिती.सकाळी १० वाजता शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे आगमन व राखीव,त्यानंतर सोयीनुसार रामटेककडे प्रयाण करतील.
- Advertisement -

