Friday, September 11, 2026
Homeगडचिरोलीसर्वसामान्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करा... - गडचिरोली जिल्हाधिकारी...

सर्वसामान्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करा… – गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचरोली :-शासकीय योजनांचा लाभ ज्या भागापर्यंत अद्याप पोहचला नाही किंवा जे नागरिक योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत,यंत्रणेने त्यांच्यापर्यंत पोहचून व विशेष शिबीर आयोजित करून त्यांना विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्राधाण्याने प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिल्या.
महिला व बाल विकास विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा संबंधीत यंत्रणाकडून जिल्हाधिकारी यांनी घेतला.याप्रसंगी ते बोलत होते.जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे,जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रकाश भांदककर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना इंगोले,बाल विकास प्रकल्प अधिकारी ज्योतीकडू,माविमचे सचिन देवतळे तसेच दूरदृष्य प्रणालीद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी पुढे सांगितले की लोकल ते ग्लोबल संकल्पनेवर स्थानिक उत्पादनांना ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने यशस्विनी व स्त्री-शक्ती पोर्टल उपलब्ध करून दिले आहे.ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून बचतगटांनी तयारी केलेली नाविन्यपूर्ण व दर्जेदार उत्पादने विक्रीसाठी या पोर्टलच्या माध्यमातून विशेष व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.याबाबतची माहिती सर्वांपर्यंत पोहचविण्याचे व प्रशासकीय यंत्रणेने स्थानिक उत्पादन विक्रीला वाव मिळण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.बचतगटाद्वारे उत्पादित वस्तू विक्रीसाठी जिल्ह्यात मॉल तयार करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचेही त्यांनी सांगितले.
अंगणवाडींचा आढावा घेतांना स्वत:ची जागा नसलेल्या अंगणवाडींना नवीन इमारत उपलब्ध व्हावी यासाठी नियोजन विभागाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्‍यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी यांनी महिला बाल विकास विभागाच्या स्वाधार गृह,वन स्टॉप सेंटर,महिला हेल्पलाईन १८१, महिला सक्षमिकरण केंद्र,मनोर्धर्य योजना,समुपदेशन केंद्र,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना,हिकरणी कक्ष आदि विविध योजनाचा आढावा यावेळी घेतला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!