Friday, October 16, 2026
Homeगडचिरोलीसमाजातील कोणतीही व्यक्ती हत्ती रोगाच्या उपाययोजना पासून वंचित राहू नये - डॉ.देवराव...

समाजातील कोणतीही व्यक्ती हत्ती रोगाच्या उपाययोजना पासून वंचित राहू नये – डॉ.देवराव होळी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-  हत्तीरोग हा घातक असा रोग असून यात शारीरिक व मानसिक दुष्परिणाम होतात. यावर उपचार केले नाही तर संबंधित व्यक्तीचे आयुष्य निरर्थक बनते यासाठी हतीरोगाचे उच्चाटन करण्यासाठी अत्यंत परिणामकारक औषधांचा वापर होणार आहे.समाजातील कोणतीही व्यक्ती या रोगाच्या उपाययोजना पासून वंचित राहू नये म्हणून हत्तीरोग दूरीकरण औषधोपचार मोहीमेत सहभागी होऊन औषधांचे सेवन आरोग्य कर्मचार्यांचे समक्ष करून हि मोहीम यशस्वी करावी असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले. 

राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत हत्तीरोग दूरीकरण औषधोपचार मोहीम चामोर्शी व आरमोरी तालुक्यात १० ते २० फेबुवारी २०२३ या कालावधीत राबविण्यात येत आहे.या मोहिमेचा शुभारंभ तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय चामोर्शी येथे १० फेबुवारीला आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

 सदर मोहिमे अंतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दावल साळवे,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.कुणाल मोडक,हत्तीरोग अधिकारी डॉ. महेंद्र देवळीकर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रफुल हुलके उपस्थित होते.चामोर्शी तालुक्यात एकूण १९९ गावे असून घोट,रेगडी,आमगाव महाल,भेंडाला, कोनसरी, मार्कंडा कंसोबा या साथ प्राथमिक आरोग्य केंद्रातील ५३ उपकेंद्र मधील पात्र असलेल्या ०१ लाख ६२ हजार १२२ लाभार्थ्यांना आरोग्य कर्मचारी यांचे समक्ष गोळ्या खाऊ घालण्यात येणार आहे.दोन वर्षाआतील बालके,गरोदर माता,दुर्धर आजारी असलेल्याना हत्तीरोग गोळ्याचे सेवन करता येणार नसल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रफुल हुलके यांनी मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी दिली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!