Saturday, October 3, 2026
Homeनागपूरसंशय आल्याने लाच रक्कम घेण्यास नकार; भूमी अभिलेख कार्यालयाच्या भुकरमापकास एसीबीने घेतले...

संशय आल्याने लाच रक्कम घेण्यास नकार; भूमी अभिलेख कार्यालयाच्या भुकरमापकास एसीबीने घेतले ताब्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-शेतीचे सात-बारे वेगळे करण्यासाठी तब्बल ७५ हजारांच्या लाचेची मागणी करून तडजोडी अंती ३० हजारावर सेटलमेंट झालेली असतांनाच एसीबीच्या पथकाचा संशय बळावल्याने लाच रक्कम घेण्यास नकार देणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयाच्या भुकरमापकास एसीबीने ताब्यात घेतले.विशाल तुकाराम मंडगीकर वय ३३ वर्षे,पद-भुकरमापक, वर्ग-३,भूमी अभिलेख कार्यालय,पारशिवणी,जि.नागपूर असे आरोपीचे नाव असून लाच प्रकरणी आज,शुक्रवार १४ ऑगस्ट रोजी नागपूर ग्रामीणच्या पारशिवणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं.५१९/२०२६ कलम ७(अ)भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८(सुधारणा २०१८)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार,प्रकरणातील २८ वर्षीय पुरुष तक्रारदार यांनी शेतीचे ७/१२ वेगळे करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालय,पारशिवनी येथे मोजणीचा अर्ज केला होता.दरम्यान,१० ऑगस्ट २०२६ रोजी भूमी अभिलेख कार्यालयातील विशाल मंडगीकर यांनी काम लवकर करून द्यायचे असेल तर ७५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून नॉर्मल प्रोसेसला एक ते दीड वर्ष लागेल,असे म्हटले. तक्रारदाराकडे एवढी मोठी रक्कम नसल्याने,तसेच लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नागपूर येथे १२ ऑगस्ट २०२६ रोजी लेखी तक्रार देऊन कायदेशीर कारवाईची मागणी केली.सदर तक्रारीवरून काल,गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ रोजी पथकाने पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता तडजोडीअंती मंडगीकर यांनी ३० हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली.यावेळी नागपूर ते पारशिवणी फाटा येथील तामसवाडी फाटा जवळ पंचासमक्ष सापळा कारवाई दरम्यान विशाल मंडगीकर यांना तक्रारदार यांचेवर संशय आल्याने त्यांनी लाच रक्कम स्विकारली नाही.प्रकरणी लाच मागणी पडताळणी वरून मंडगीकर यांना ताब्यात घेण्यात आले व आज लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई सापळा अधिकारी संतोष जाधव, पोलीस निरीक्षक,ला.प्र.वि.नागपूर,पर्यवेक्षक अधिकारी भारती गुरुनुले,पोलीस उपअधीक्षक,ला.प्र.वि.नागपूर, सापळा पथकातील पोलीस निरीक्षक मयूर चौरासिया, मपोहवा कांचन गुलबासे,पो.हवा.अनिल चांदुरकर,योगेश साधनकर,विकेश राऊत सह चालक पोहवा विलास इंगळे यांनी कारवाई केली; तर दिंगबर प्रधान,पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.नागपूर,श्रीमती माधुरी बाविस्कर अप्पर पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि.नागपूर व विजय माहुलकर,अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.नागपूर यांचे मार्गदर्शन लाभले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या पिकअप वाहनाचा अपघात; नऊ जण गंभीर जखमी,तर आठ जण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त :-पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर जिल्ह्यात निघालेल्या मजुरांच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना आज,शनिवार ३ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिस...

काँग्रेसकडून विधान परिषद निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा.. -नागपूर पदवीधर मतदार संघासाठी अभिजीत वंजारी यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा  केली.यामध्ये नागपूर पदवीधर...

राहत्या घरातच सुरू होता देहव्यापाराचा अड्डा; पोलिसांची धाड.. – दोन पिडीत महिलांची सुटका,तर दोन महिलांना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राहत्या घरात देहव्यापाराचा अड्डा चालवणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे.या प्रकरणी घटनास्थळावरून आरोपींच्या ताब्यातून...

संशयाच्या भुताने झपाटलेल्या पतीने केली पत्नीची हत्या; शवविच्छेदन अहवालात फुटले बिंग..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-संशयाचा भूत भल्या-भल्यांना नरकात धाडत असतो.तो एकदा कां अंगात शिरला,तर कधी काय होणार हे सांगणे अवघड आहे.अश्याच प्रकारे संशयाच्या भुताने झपाटलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!