Sunday, August 9, 2026
Homeनवी दिल्लीश्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताब विषयी पोलिसांकडून मोठा खुलासा...- हत्येनंतर हाडे...

श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताब विषयी पोलिसांकडून मोठा खुलासा…- हत्येनंतर हाडे मिक्सरमधे टाकून केला चुराडा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नवी दिल्ली :- संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात अजून काही धक्कादायक खुलासे होऊ लागले आहेत.श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताब पुनावाला याने तिची हाडे मिक्सरमध्ये टाकून त्याचा चुरा केला होता.यानंतर त्याने त्या राखेची विल्हेवाट लावली होती असा दिल्ली पोलिसांचा दावा आहे.आफताबने मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर जंगलात फेकून दिले होते. यामध्ये तिचे मुंडके सर्वात शेवटी होते. त्याने तब्बल तीन महिन्यांनी हे मुंडके फेकून दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी पोलिसांनी ६६०० पानांचे चार्जशीट दाखल केले आहे. चार्जशीटमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार,१८ मे २०२२ रोजी हत्येच्या रात्री आफताबने झोमॅटोवरुन (Zomato) चिकन रोल मागवले होते.कुटुंबीयांनी विरोध केल्यानंतर श्रद्धा आफताबसह दिल्लीत वास्तव्यास आली होती.पण दिल्लीत आल्यानंतर काही दिवसांतच दोघांमध्ये वाद सुरु झाले होते.घरखर्च,आफताबची प्रेयसी अशा अनेक मुद्द्यांवरुन दोघांमध्ये खटके उडू लागले होते. चार्जशीटमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, आफताबच्या दिल्लीपासून ते दुबईपर्यंत प्रेयसी होत्या. ८ मे रोजी दोघेही मुंबईला जाणार होते.पण अचानक आफताबने तिकीट रद्द केले होते. यावरुन दोघांमध्ये पुन्हा एकदा भांडण झाले होते.भांडणादरम्यान आफताबने गळा दाबून श्रद्धाची हत्या केली. चार्जशीटमध्ये सांगितले आहे.त्यानुसारआफताबने प्रथम मृतदेह एका प्लास्टिक पिशवीत गुंडाळून फेकून देण्याचा विचार केला होता.त्याने त्यासाठी पिशवीही विकत आणली होती.पण आपण पकडले जाऊ या भीतीने त्याने ही योजना रद्द केली.यानंतर त्याने मृतदेहाचे तुकडे केले.यासाठी त्याने एक करवत,एक हातोडा आणि तीन चाकू विकत घेतले.बोटे वेगळी करण्यासाठी त्याने ब्लो टॉर्चचा वापर केला. आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले आणि फ्रीजमध्ये ठेवून दिले.जेव्हा कधी घरी प्रेयसी यायच्या तेव्हा आफताब फ्रीजमधून मृतदेहाचे तुकडे काढून ते किचनमध्ये ठेवत असे असं पोलिसांनी सांगितले आहे. आफताबने श्रद्धाचा फोन आपल्याकडेच ठेवला होता. १८ मे नंतर तोच श्रद्धाच्या अकाऊंटचा वापर करत असल्याचे समोर आले आहे.यानंतर त्याने तिच्या मोबाइलची विल्हेवाट लावली होती.पोलिसांना मृतदेहाचे २० तुकडे सापडले आहेत.पण अद्याप मुंडके सापडलेले नाही.पॉलीग्राफ आणि नार्को-टेस्टमध्ये आफताबने आपला गुन्हा कबूल केला आहे. यावेळी त्याने आपल्याला पश्चाताप होत असल्याचे म्हटले असल्याचाही उल्लेख चार्जशीटमध्ये आहे. आफताबचा कबुली जबाब पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही.त्याने पोलिसांसमोर दिलेला पहिला कबुलीजबाबही न्यायालयात वापरता येत नाही.अटक केलेल्या व्यक्तीने दिलेला दाखला केवळ न्यायदंडाधिकार्‍यासमोर सादर केल्यावरच पुरावा म्हणून वापरता येतो.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजच्या शंकरपूर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या  आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना शाखा शंकरपूर यांच्या वतीने आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन...

आता गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीवर आकारला जाणार दहापट दंड..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीला प्रभावी आळा घालण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता,१९६६ मधील कलम ४८(७)मध्ये सुधारणा करण्यास मंगळवार २८ जुलै...

धावपट्टीवरून घसरला विमान; अजित पवारांच्या आठवणी ताज्या..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या बारामती एअरफिल्डवर प्रशिक्षण सरावादरम्यान एक ट्रेनर विमान धावपट्टीवरून घसरल्याची घटना आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली...

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या दाखल गुन्ह्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी व तिच्यासोबत असलेल्या संशयित आरोपीचा शोध घेण्यात अनैतिक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!