Sunday, September 6, 2026
Homeगोंदियाशेतशिवारात आढळून आला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह..

शेतशिवारात आढळून आला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील देऊटोला-बबई कालव्याजवळ शेतशिवारात आज,सोमवार १० फेब्रुवारीला सकाळच्या सुमारास आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.
याबाबत अधिक माहिती अशी की,गोरेगाव तालुक्यातील देऊटोला-बबई येथील काही शेतकरी आज सोमवार सकाळच्या सुमारास शेतबांधावर गेले असता शेत परिसरात काहीतरी जळत असल्याचे दिसून आले. त्यामुळे जवळ जाऊन बघितले असता एका अज्ञात महिलेच्या अंगावर तणस व त्यावर चादर टाकून पेटविण्यात आल्याचे दिसून आल्याने एकच धांदल उडाली.सदर घटनेची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरताच गावकऱ्यांनी एकच जमाव केला.घटनेची माहीती गोरेगाव पोलिस प्रशासनास देताच घटनास्थळी गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय भुसारी ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले.घटनास्थळाची पाहणी करून अर्धवट जळालेल्या मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला.अज्ञात महिलेचा चेहरा व वरील भाग पूर्णपणे जळालेला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सदर अज्ञात महिलेचे अंदाजे वय २३ ते ३० वर्षाच्या आत असून महिला कोण? तिला जाळून मारण्याचा प्रयत्न कां व कुणी केला,हे पुढील तपासाअंती कळणार असल्याचे गोरेगाव पोलिसांनी स्पष्ट केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!