उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधवांना २४ फेब्रुवारी २०२५ रोजी बिहारमधील भागलपूर येथील एका कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता जारी करीत शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये हस्तांतरित केले होते.अशातच राज्याच्या नमो शेतकरी सन्मान योजनेचे ५ हप्ते वितरीत करण्यात आले. मात्र,सहाव्या हप्त्याची रक्कम केव्हा जमा केली जाणार,याकडे राज्यातील शेतकरी बांधवांचे लक्ष लागून होते.त्यातच आता नमो शेतकरी सन्मान योजनेबाबत राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी याबाबत माहिती दिली असून उद्या सोमवार ३१ मार्चला राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यात २ हजार रुपये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (डीबीटी) जमा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आतापर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत ५ हप्ते वितरित करण्यात आले असून ९०.८६ लाख शेतकरी कुटुंबांना ८९६१.३१ कोटी रुपयांचा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! ‘पीएम किसान’ चे झाले; आता ‘नमो शेतकरी योजनेचे’ २ हजार येणार खात्यात..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

