Friday, August 28, 2026
Homeकुरखेडाशेतकऱ्यांचा रब्बी हंगाम अडचणीत; अंतरगाव उपकेंद्राच्या ट्रान्सफॉर्मरची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश..

शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम अडचणीत; अंतरगाव उपकेंद्राच्या ट्रान्सफॉर्मरची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या अंतरगाव येथील ३३ केव्ही विद्युत उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे परिसरातील विद्युत पुरवठा प्रभावित झालेला आहे.दुरुस्ती करीता विलंब होत असल्याने शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम अडचणीत आलेला आहे. सदरची समस्या लक्षात येताच आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी शेतकऱ्यांसह भेट देत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत तातडीने दुरुस्ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.या परीसरात रब्बी हंगामात धान व मका या पीकाची मोठी लागवड करण्यात आली आहे.सद्या पीकाला पाण्याची गरज आहे.मात्र,मागील काही दिवसांपासून अंतरगाव विज उपकेंद्रातील बिघाडामूळे कृषीपंप निकामी होत पीके करपण्याचा धोका निर्माण झाला.समस्येची जाण होताच आमदार रामदास मसराम यांनी उपकेंद्राला भेट देत परिस्थितीची पाहणी केली.यावेळी त्यांनी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.तसेच मुख्य अभियंता यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या व वीजपुरवठा पूर्ववत सुरळीत सुरू करण्याचे निर्देश दिले.तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन कामात कोणतीही दिरंगाई होऊ नये,असे सांगितले.या प्रसंगी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन पाटिल नाट,माजी पंचायत समिती सभापती गिरिधर तितराम,माजी नगरसेवक उस्मान पठान,भावेश मुंगनकर,रवि राउत,डोमा जमदाळ, मुकुंदा नहामुरते,बिनविसार पगाडे,गजेंद्र दरवडे,प्रल्हाद दरवडे,ज्ञानेश्वर मसराम,चेतन मेश्राम,महादेव नागोसे, खुशाल नहामुरते,सुशील कन्नाके,भजन जमदाळ,दिवाकर मारगाये यांचेसह स्थानिक शेतकरी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • मिथुन मुरकुटे,उपविभागीय अभियंता,विद्युत वितरण कंपनी कुरखेडा👇
शेतकऱ्यांची होणारी अडचण लक्षात घेत बिघाड निर्माण झालेल्या ट्रान्स्फार्मरची‌ दुरुस्ती करण्यात आलेली आहे व सद्या टेस्टिंग सुरू आहे.आज रात्री वा उद्या मंगळवारला विद्युत भार ट्रान्सफॉर्मरवर टाकत पूर्ण क्षमतेने ट्रान्सफॉर्मर कार्यान्वीत करण्यात येईल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

किरण चौधरी “मनस्विनी साहित्यरत्न पुरस्कारा”ने सन्मानित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दैनिक देशोन्नती "मनस्विनी साहित्यरत्न पुरस्कार" व दैनिक देशोन्नतीच्या ‘मनस्विनी’ सदरातून आपल्या लेखणीची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या गडचिरोलीतील किरण महादेव चौधरी यांच्या ‘लेखमंजिरी’...

आलापल्ली-सिरोंचा महामार्गावर प्रवास करून जिल्हाधिकाऱ्यांकडून कामांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या मार्गावर प्रत्यक्ष प्रवास करून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.महामार्गावरील उर्वरित...

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!