Saturday, October 24, 2026
Homeदेसाईगंजशेतकरी समृद्ध होण्यासाठी बळीराजाची राज्यव्यवस्था  आवश्यक-प्रा.दामोधर शिंगाडे यांचे प्रतिपादन 

शेतकरी समृद्ध होण्यासाठी बळीराजाची राज्यव्यवस्था  आवश्यक-प्रा.दामोधर शिंगाडे यांचे प्रतिपादन 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज (गडचिरोली) :- देशात अन्न उत्पादन करणारा शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात असुन अन्नदात्यालाच आज उपासमारी चा सामना करावा लागत आहे.शेतकरी आत्महत्तेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असुन ही दुरावस्था थांबविण्यासाठी देशात बळीराजा प्रणित विचारसरणीची राज्यव्यवस्था अस्तित्वात येण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन ओबिसी समाज संघटनेचे नेते प्रा.दामोधर सिंगाडे यांनी केले आहे .                                 

आज १४ नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या बलिप्रतिपदा  सणाचे औचित्य साधुन ओबिसी बांधवांनी शेतकऱ्यांचा कैवारी आणि बहुजनांची शासन व्यवस्था अस्तित्वात आणणारे महान सम्राट बळीराजा यांचा स्मृती दिन म्हनुण बलिप्रतिपदा या दिवसी देसाईगंज च्या लाखांदुर टी पॉईंटवर बळीराजांच्या प्रतिमेचे पुजन करुन त्यांना आदरांजली वाहण्यात आली.या प्रसंगी आपले विचार व्यक्त करतांना प्रा.दामोधर सिंगाडे म्हणाले की,भारत हा कृषी प्रदान देश म्हनुण ख्याती प्राप्त होण्याचे कारणच बळीराजा यांची शासन व्यवस्था होती.अन्न उत्पादन करणारा शेतकरी वर्ग हा बहुसंख्य प्रमाणात असुन या वर्गाची प्रगती व्हावी; यासाठी बळीराजाने आपल्या शासन व्यवस्थेत मोठे निर्णय घेतले.शेतकरी प्रगती करु लागल्याने देशात सोन्याचा धुर निघु लागला.शेतकऱ्यांचे अहित बाळगणाऱ्या काही वर्गाच्या लोकांना ही बाब आवळली नाही.त्यांनी बळीराजा चा खुन केला आणि खोटा इतिहास पसरविण्याची सुरुवात केली. बळीराजाचा खरा इतिहास दळविल्या गेला तेव्हापासुनच शेतकऱ्यांवर अवकळा येण्याची सुरुवात झाली.देशातिल शेतकर्यांची प्रगती होण्यासाठी देशात बळिराजा प्रणित विचारसरणी ची शासन व्यवस्था निर्माण होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन प्रा.सिंगाडे यांनी केले.

या प्रसंगी ओबिसी समाजाचे नेते धनपाल मिसार, मुरलिधर सुंदरकर,लोकमान्य बरडे,सागर वाढई,दिलिप नाकाडे,प्रा.सदाराम ठाकरे,विष्णु नागमोती,ज्ञानदेव पिलारे,उरकुडे,चक्रधर पारधी,शंकर पारधी,दिपक प्रधान,से.नि.पो.उप.नि.सेलोटे,मातेरे,माजि सरपंच राजु बुल्ले,देशकर करुणा,कुळे,विलास बन्सोड,ज्ञानेश्वर कवासे यांचेसह ओबिसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरणीची मालिका सुरू; किंमती कमी होण्याचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त :-सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.आज,शनिवार २४ ऑक्टोंबर रोजी इंडीयन बुलियन मार्केटनुसार, देशभरात १० ग्रॅम...

एटापल्लीतील ३० गावांत जलसुरक्षा व शाश्वत उपजीविकेसाठी कार्यक्रम; ९६० कोटी लिटर अतिरिक्त जलक्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील ३० आदिवासी गावांमध्ये जलसुरक्षा बळकट करणे,शेतीची उत्पादकता वाढविणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी...

नागपूर विभाग पदवीधर निवडणूक; गडचिरोली जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी सर्वाधिक.. -विभागाची सरासरी ६४.७६ टक्के..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत प्राप्त अहवालानुसार दुपारी ४ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ७२.९५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण...

रस्त्याच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; काम पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी परिसरातील खांदला–चिरेपल्ली आणि चिरेपल्ली–आलापल्ली या एकूण २२ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. त्यांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!