Tuesday, October 13, 2026
Homeमुंबईशेतकरी बांधवांसाठी दिलासादायक बातमी; कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर..

शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक बातमी; कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक बातमी असून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची तिसरी यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.जाहीर करण्यात आलेल्या तिसऱ्या यादीमध्ये राज्यातील तब्बल ३ लाख ५१ हजार १९२ शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.यात नागपूर विभागातील ३० हजार ७३८ शेतकरी,छत्रपती संभाजीनगर विभागातील  २ लाख ६ हजार ४५० शेतकरी,अमरावती विभागातील ८५ हजार ७६ शेतकरी, नाशिक विभागातील १४ हजार २४४ शेतकरी,पुणे विभागातील ११ हजार ९२८ शेतकरी,तर कोकण विभागातील २ हजार ७५६ शेतकऱ्यांचा समावेश आहे. सदरच्या याद्या ह्या जिल्हा निहाय संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या असून सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपल्या कर्जखात्याची थकबाकी तपासून तातडीने नजीकच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रावर’ जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे आणि कर्जमुक्तीचा लाभ घ्यावा,असे आवाहन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर सिंदेवाहीच्या राज्य महामार्गावर गतीरोधक बसविण्यास सुरुवात.. -अपघातांचा संभाव्य धोका कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत सिंदेवाही शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक-९ वरील रस्ता सुरक्षेचा मुद्दा...

संभाव्य पाणीटंचाईसाठी गावनिहाय नियोजन करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना.. -पाच तालुक्यांमधील ३६ संवेदनशील गावांमध्ये भूजल पातळी घसरली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे सूक्ष्म नियोजन,पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे संरक्षण आणि टंचाई निवारणाच्या उपाययोजनांना गती द्यावी.भूजल पातळी घसरलेल्या संवेदनशील...

दुष्काळग्रस्त तालुक्यांत मोफत धान्य वितरणासाठी विशेष नियोजन.. -स्थलांतरितांना इतर ठिकाणच्या रास्तभाव दुकानातून धान्य घेण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुष्काळग्रस्त गडचिरोली व चामोर्शी तालुक्यांतील पात्र कुटुंबांना नियमित मोफत अन्नधान्याचा पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे.शेतीवर अवलंबून असणारे...

‘यूपिआय’ वापरकर्त्यांसाठी दिलासा; शुल्क आकारणी पुढे ढकलली..

उद्रेक न्युज वृत्त :-येत्या,गुरुवार १५ ऑक्टोंबर २०२६ पासून दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पात्र 'पर्सन टू मर्चंट' व्यवहारांवर ०.४ टक्के एमडीआर म्हणजेच 'मर्चेंट डिस्काउंट...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!