Sunday, May 31, 2026
Homeगोंदियाशिक्षण विभागातील लेखाधिकारी अडीच हजाराची लाच घेतांना अटकेत...

शिक्षण विभागातील लेखाधिकारी अडीच हजाराची लाच घेतांना अटकेत…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-शिक्षण विभागातील लेखाधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करीत लेखाधिकारी संजय रामभाऊ बोकडे वय ४९ वर्षे याला २ हजार ५०० रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. आरोपी बोकडे हे लेखा परीक्षण पथक शिक्षण विभाग, गोंदिया येथे लेखाधिकारी (वर्ग-२) पदावर कार्यरत आहेत.
तक्रारदार हे लोकसेवा विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय,कोसमतोंडी ता.सडक-अर्जुनी येथे मुख्याध्यापक आहेत.कर्मचारी भीमराव रंगारी यांचे डिसेंबर २०२४ मध्ये निधन झाले.त्यांच्या आश्वासित प्रगती योजनेच्या दुसऱ्या वेतन निश्चितीच्या पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रे लेखाधिकारी बोकडे यांना देण्यात आली होती.वेतन निश्चितीच्या प्रक्रियेसाठी बोकडे यांनी सुरुवातीला ३ हजार रुपये लाचेची मागणी केली.तडजोडीनंतर ही रक्कम २ हजार ५०० रुपये ठरली.तक्रारदाराने या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे केली. सोमवारी २४ मार्चला सापळा रचण्यात आला. दरम्यान,लेखाधिकारी बोकडे याने तक्रारदाराकडून पंचांसमक्ष २ हजार ५०० रुपये लाच स्वीकारताच त्याला रंगेहाथ अटक करून गोंदिया शहर पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अंगझडतीत बोकडे याच्याकडे ३५ हजार ५०० रुपये आढळून आले.त्याचा मोबाइलही ताब्यात घेण्यात आला.याप्रकरणी पोलिसांनी संजय बोकडे याच्या घराची झडतीही घेतली.सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रधान पोलिस अधीक्षक डॉ.दिगंबर प्रधान,अप्पर पोलिस अधीक्षक सचिन कदम,संजय पुरंदरे,पोलिस उपअधीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजीव कर्मलवार, पोलिस उपनिरीक्षक विलास काळे,पोलिस निरीक्षक उमाकांत उगले, सहाय्यक फौजदार चंद्रकांत करपे,पोलिस हवालदार मंगेश काहालकर,शिपाई संतोष शेंडे,संतोष बोपचे,अशोक कापसे,संगीता पटले,रोहिणी डांगे,चालक दीपक बाटबर्वे यांनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धानोरा व एटापल्ली तालुक्यात २० हजार धुररहित चुलींचे वितरण.. -दरवर्षी ४१ हजार टनांहून अधिक जळाऊ लाकडाची होणार बचत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शन व पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा व एटापल्ली या दुर्गम,आदिवासी तालुक्यांमध्ये राबविण्यात आलेल्या धुररहित चुल उपक्रमाला उल्लेखनीय...

चार दिवसांत उष्माघाताचे तब्बल १८ जण बळी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या नवतपाचे दिवस सुरू आहेत.२५ मे २०२६ पासून सुरू झालेली सूर्याची दाहकता २ जून २०२६ पर्यंत राहणार आहे.अश्यातच भयंकर तापणाऱ्या नवतप्याने...

हाताची दोन बोटे दाखवून सेल्फी काढत असाल तर सावधान..!

उद्रेक न्युज वृत्त :-डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे.काही कालावधीपासून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांची फसवणूक...

‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ व ‘उच्चरक्तदाब दिना’ निमित्त पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' आणि 'जागतिक उच्चरक्तदाब दिना'चे औचित्य साधून गडचिरोली येथे एक विशेष आरोग्य जनजागृती आणि तपासणी शिबिर उत्साहात पार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!