Friday, April 17, 2026
Homeगडचिरोलीशासकीय इतमामात शहीद जवानास श्रद्धांजली अर्पण.. -सहपालकमंत्र्यांकडून कुटुंबीयांचे सांत्वन..

शासकीय इतमामात शहीद जवानास श्रद्धांजली अर्पण.. -सहपालकमंत्र्यांकडून कुटुंबीयांचे सांत्वन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नक्षलवाद्यांविरोधात कारवाई करतांना वीरगती प्राप्त झालेले सी-६० कमांडो महेश नागुलवार यांच्यावर आज,बुधवार १२ फेब्रुवारीला त्यांच्या गावी अनखोडा (ता.चामोर्शी) येथे शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली व कुटुंबीयांचे सांत्वन केले.पोलीस पथकाने बंदुकीच्या फैरी झाडून शहीद जवानाला मानवंदना दिली.आमदार डॉ.मिलिंद नरोटे,जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल आणि इतर मान्यवरांनीही पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
पोलीस मुख्यालयात मानवंदना👇
तत्पूर्वी,आज सकाळच्या सुमारास गडचिरोली पोलीस मुख्यालयातही शहीद महेश नागुलवार यांना पोलीस मानवंदना देण्यात आली.यावेळी अतिरिक्त पोलीस महासंचालक (स्पेशल ऑपरेशन) राजकुमार व्हटकर, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा,नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील,उपमहानिरीक्षक अंकित गोयल,पोलीस अधीक्षक निलोत्पल तसेच सीआरपीएफचे पोलीस अधीक्षक सुमित वर्मा आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
नक्षलविरोधी कारवाईत वीरमरण👇
भामरागड तालुक्यातील फुलनार जंगल परिसरात सी-६० जवानांनी नक्षलवादी तळ उद्ध्वस्त करण्याची मोठी कारवाई केली होती.मात्र,या कारवाईदरम्यान महेश नागुलवार यांना गोळी लागली.उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात आई,पत्नी आणि दोन मुली असा आप्तपरिवार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

देसाईगंज-आरमोरी काँग्रेस कमिटीची “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या सिंधू भवन येथे आज,शुक्रवार १७ एप्रिल रोजी तालुका काँग्रेस कमिटी देसाईगंज-आरमोरी यांच्या वतीने आयोजित “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” उत्साहात पार...

भोंदूबाबाच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचे कारनामे उघड होताच अख्खा महाराष्ट्र हादरून गेला.विधीच्या नावाने अनेक उच्चभ्रू महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अशोक खरातला ताब्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!