उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढील पाच वर्षांत दुधाची भुकटी आयात करणार नाही; असे आश्वासन केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी दिले आहे.पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता.
केंद्र सरकारने दूध भुकटी आयातीचा निर्णय रद्द करावा,यासाठी पाठपुरावा सुरू असताना विरोधकांनी याचे राजकारण करून दूध प्रक्रिया प्रकल्पामध्ये सुद्धा फेक नरेटिव्हचे राजकारण करण्यास सुरुवात केली होती; पण केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या आश्वासनाने दूध उत्पादक शेतकरी आणि दूध प्रक्रिया केंद्राना मोठा दिलासा मिळणार असल्याचे विखे म्हणाले.
शासकीय अनुदानासह दुधाला सरसकट ३५ रुपये भाव जाहीर केला आहे.दूध भुकटीच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी १० हजार मेट्रिक टन भुकटीवर ३० रुपयाचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर दुधाला हमी भाव मिळावा; यासाठी केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार केला असून,त्याला केंद्र सरकारने सकारात्मता दाखवली आहे.यामुळे त्याबाबतही लवकरच कायदा केला जाईल,असा विश्वासही विखे पाटील यांनी व्यक्त केला.

