- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात सध्या उष्णतेने कहर केला आहे.राज्यातील अनेक शहरांवर सूर्य आग ओकत असून विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी हे शहर काल शुक्रवारी देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे.येथील तापमान ४७.२ अंश सेल्सिअस एवढे विक्रमी तापमान नोंदवण्यात आले.त्याचबरोबर, वर्धा जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर होता.याठिकाणी ४७.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली,तर अमरावती-४६.४,चंद्रपूर-४६.४,गडचिरोली-४६.०,नागपूर-४५.७,यवतमाळ-४५.४,गोंदिया-४४.९०,अकोला-४४.८०,वाशिम-४२.६,भंडारा-४२.०,जळगाव-४१.९,छत्रपती संभाजीनगर-४१.४,परभणी-४१.३,बुलडाणा-४१.०,बीड-४०.५,धाराशिव-३८.६,सोलापूर-३६.८,नाशिक-३६.३ आणि मुंबई-३४.५ इत्यादी तापमान नोंदवल्या गेले. अश्यातच हवामान खात्याने पुढील दोन दिवस विदर्भात उष्णतेचा तडाखा कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.तसेच अकोला,अमरावती व वर्धा या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट,तर नागपूर व यवतमाळ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.या पार्श्वभूमीवर आज,शनिवार २३ मे रोजी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी विदर्भातील शाळांच्या सुट्ट्यांत वाढ करण्याचे संकेत दिलेत.मंत्री पंकज भोयर याविषयी बोलतांना म्हणाले की,तापमानात दिवसेंदिवस सातत्याने वाढ होत आहे.१० जूननंतरही विदर्भात उष्णतेची लाट सुरू राहिली तर विदर्भात १५ जूनपासून सुरू होणाऱ्या शाळा या २६ जूनपासून सुरू करण्यावर सरकार विचार करेल. शालेय शिक्षण विभाग लवकरच या प्रकरणी बैठक घेऊन स्थितीचा आढावा घेणार आहे.या प्रकरणी लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल.नागपूर विद्यापीठाच्या सर्व परीक्षा सकाळच्या सत्रात घेतल्या जातील.तसेच केंद्रांची संख्याही वाढवण्याचा निर्णय घेतला जाईल.असे मंत्री भोयर यांनी स्पष्ट केल्याने वाढत्या उष्णतेमुळे शाळांच्या सुट्ट्यात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
- Advertisement -

