Monday, July 13, 2026
Homeगडचिरोलीशाळा व सर्व शासकीय कार्यालयांच्या शंभर यार्ड परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची...

शाळा व सर्व शासकीय कार्यालयांच्या शंभर यार्ड परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाईचे आदेश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राष्ट्रीय तंबाखू विरोधी दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा समन्वय समितीची आढावा सभा आज,मंगळवार २६ मे रोजी प्रभारी जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली.यावेळी शालेय मुलांमध्ये वाढत असलेल्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली.
सभेत शालेय स्तरावर तंबाखूमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी विविध जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना शिक्षण विभागाला देण्यात आल्या.तसेच शाळा व सर्व शासकीय कार्यालयांच्या शंभर यार्ड परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आले.यावेळी सर्व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्यावर विशेष भर देण्यात आला. प्रत्येक विभाग प्रमुखांनी आपल्या कार्यालय परिसरात तंबाखूमुक्त वातावरण राखण्यासाठी आवश्यक ती दक्षता घ्यावी तसेच नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करावे,अशा सूचना गावंडे यांनी दिल्या.
सभेत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.जनजागृती मोहीम,शैक्षणिक संस्थांमधील उपक्रम,तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवरील नियंत्रण तसेच विविध विभागांमधील समन्वय याबाबत चर्चा करण्यात आली.या बैठकीस समितीच्या सचिव तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कोटुले, गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव अनिल हिरेखन,पोलीस अधीक्षक कार्यालयातील पीडी(एलसीबी)अरुण फेगडे, जिल्हा सल्लागार(NTCP)डॉ.प्रेरणा राऊत,अन्न व औषध प्रशासन विभागाचे कुंजाम,मुक्तिपथचे संतोष सावलकर, शिक्षण विभागाचे मडावी तसेच सामाजिक कार्यकर्त्या मीना दिवटे आदी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!