Thursday, September 3, 2026
Homeनागपूरशालार्थ आयडी घोटाळ्यातील फरार आरोपी तब्बल चार महिन्यांनी पोलिसांच्या हाती..!

शालार्थ आयडी घोटाळ्यातील फरार आरोपी तब्बल चार महिन्यांनी पोलिसांच्या हाती..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-राज्यात शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस येताच अनेकांचे धाबे दणाणले आहेत.ज्यांना शिक्षण क्षेत्रातील कुठलाही अनुभव नाही,अश्यांनाही मुख्याध्यापक,शिक्षक बनवून त्यांचे वेतन काढल्या गेले.यात शासनास कोट्यवधी रुपयांना चुना लावल्या गेला.अश्यातच बोगस शालार्थ आयडी प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला निलेश वाघमारे यास आज,गुरुवार १४ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास सायबर पोलिसांनी नागपूरच्या धरमपेठ येथून अटक केली आहे.निलेश वाघमारे हा २०१९ ते ९ एप्रिल २०२५ या कालावधीत वेतन पथक अधीक्षक (प्राथमिक)म्हणून कार्यरत होता.नागपूर जिल्ह्यात २०१९ पासून बोगस ‘शालार्थ आयडी’ प्रदान करून वेतनास पात्र नसलेल्या शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्यात आले आहे. आतापर्यंत जवळपास ५०० च्यावर शिक्षकांची नावे समोर आली असून शिक्षकांचे शालार्थ आयडी बोगस असल्याची माहिती असूनदेखील वाघमारेने वेतन काढले होते.या प्रकरणात नीलेश वाघमारेला निलंबित करण्यात आले होते.घोटाळा उघडकीस येताच निलेश वाघमारे तब्बल चार महिने फरार होता.तत्पूर्वी मंगळवार १२ ऑगस्ट रोजी त्याने अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.मात्र,न्यायलयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.अश्यातच खुद्द वेतन पथकाच्या बोगस आयडीचा आरोपी मालक पोलिसांच्या हाती लागल्याने अनेक घोटाळेबाज चव्हाट्यावर येऊन उबडे पडणार आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!