Sunday, July 12, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमुदत संपण्यास एक दिवस शिल्लक असतांनाच वाहन धारकांना मोठा दिलासा.. अखेर एचएसआरपी...

मुदत संपण्यास एक दिवस शिल्लक असतांनाच वाहन धारकांना मोठा दिलासा.. अखेर एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यास मुदतवाढ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे,रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन सर्व १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांसाठी एचएसआरपी म्हणजेच उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक(HSRP) बसविणे आवश्यक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असून केंद्रिय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५० अन्वये महाराष्ट्र शासनाने सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसविण्याची तरतुद करण्यात आली आहे.यासाठी राज्य सरकारने उद्या,शुक्रवार १५ ऑगस्ट २०२५ पर्यंतची मुदत दिली होती.अश्यातच राज्यातील अनेक वाहनधारकांनी एचएसआरपी नंबर प्लेट बसविलेली नाही.यासाठी एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.त्यानुसार ३० नोव्हेंबर २०२५ ही शेवटची तारीख देण्यात आली असून त्यानंतर ज्यांनी एचएसआरपी नंबर प्लेट बसविलेली नसेल,अश्यांवर येत्या १ डिसेंबर २०२५ पासून वायुवेग पथकाद्वारे नियमांनुसार कारवाई करण्यात येणार आहे.यासाठी परिवहन विभागाच्या  http://transport.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत नोंदणी करून घेणे आवश्यक असल्याचे परिवहन विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-दोन दुचाक्या समोरासमोर एकमेकींना धडकून घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार ११ जुलै रोजी सायंकाळी सात...

दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना दणका; निलंबनासह विभागीय चौकशीचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय कार्यालयात वारंवार गैरहजर राहणे,परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे, आढावा बैठकांना अनुपस्थित राहणे,रजेचे अर्ज विहित नमुन्यात व वेळेत सादर न करणे,वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना...

देसाईगंजच्या विहीरगाव(पोटगाव)येथील ‘त्या’ मातेने रुग्णवाहिकेतच दिला गोंडस मुलीला जन्म..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या विहीरगाव(पोटगाव)येथील रहिवासी स्वाती चांगदेव नेवारे ह्या माहेरी बाळंतपणासाठी गेल्या असता  आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेद्वारे गोंदियाला रेफर करत असतांनाच काही अंतरावरील मार्गावर...

कुरुडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे शासन स्तरावर प्रलंबित असलेले प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यात येतील,अशी ग्वाही आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!