Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीव्यवसाय सुरू करायचाय; तर करा ऑनलाईन.. - वैयक्तिक कर्ज १५ लाख तर...

व्यवसाय सुरू करायचाय; तर करा ऑनलाईन.. – वैयक्तिक कर्ज १५ लाख तर गट कर्ज ५० लाख रुपयांपर्यंत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मार्फत विमुक्त जाती,भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्ग तसेच पैलवान कै.मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ,राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ,ब्रम्हलिन आचार्य दिव्यानंद पुरीजी महाराज आर्थीक विकास महामंडळ, श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ,विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ व श्री.शिव गोरक्षणाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ या सहा उपकंपनी मार्फत नागरिकांकरिता स्वयंरोजगाराच्या माध्यमातुन कृषी सलंग्न व्यवसाय,लघुउद्योग,वाहतुक क्षेत्रातील संबंधीत व्यवसाय,तांत्रीक व्यवसाय,पारंपारीक व्यवसाय अथवा सेवा उद्योग सुरु करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँक व महामंडळ यांच्या संयुक्त माध्यमातुन वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा योजना सुरु आहे.वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजने अंतर्गत जास्तीत जास्त १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो व गट कर्ज व्याज परतावा योजने अंतर्गत ५० लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो.सदर दोन्ही योजनांनमध्ये लाभार्थ्याला मुद्दल आणि व्याज बँकेत भरावयाची आहे,त्यानंतर महामंडळ व्याजाची रक्क्म १२% पर्यंत लाभार्थ्याच्या वैयक्तिक खात्यात जमा करते.या योजनेच्या सर्व मार्गदर्शक सुचना महामंडळाच्या WWW.VJNT.IN या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.सदर योजनेच्या लाभासाठी संकेतस्थळावरील पोर्टलद्वारे ऑनलाईन प्रस्ताव सादर करावयाचा आहे.तसेच बीज भांडवल कर्ज योजने अंतर्गत रुपये ५ लाखापर्यंन्त (बँक सहभाग ७५% व महामंडळ सहभाग २५%) महामंडळाच्या २५% सहभागावर ४% व्याजदराने कर्ज पुरवठा करण्यात येते.तसेच थेट कर्ज योजने अंतर्गत १ लाख रुपये बीनव्याजी कर्ज पुरवठा करण्यात येतो.सदर योजने करीता महामंडळाच्या कार्यालयात अर्ज उपलब्ध आहेत.अधिक माहिती करीता महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक,वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.),डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,आय.टी.आय.चे मागे, कॉम्पलेक्स,गडचिरोली दुरध्वनी क्र.०७१३२-२२३०२६ कार्यालयात संपर्क साधावा व जास्तीत जास्त इच्छुक व्यक्ती व संस्थांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.), गडचिरोली यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!