Thursday, September 3, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसर्व प्रलंबित निवडणुका जानेवारी पर्यंत पूर्ण करा- सर्वोच्च न्यायालय - स्थानिक स्वराज्य...

सर्व प्रलंबित निवडणुका जानेवारी पर्यंत पूर्ण करा- सर्वोच्च न्यायालय – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत निवडणूक आयोगाला सुनावले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच शुक्रवार १२ सप्टेंबर रोजी राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले.विशेष म्हणजे,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या तीन वर्षांपासून रखडल्या आहेत.ओबीसी आरक्षण व इतर कारणांमुळे निवडणुका वारंवार पुढे ढकलण्यात आल्या होत्या.यापूर्वी न्यायालयाने मे २०२५ मध्ये चार महिन्यांत निवडणुका घेण्याची मुदत दिली होती.मात्र, पावसाळा आणि प्रशासनिक कारणांमुळे चार महिन्यांचा कालावधी लोटून गेला.अश्यातच आज, मंगळवार १६ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रलंबित निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला खडेबोल सुनावले आणि राज्यातील सर्व प्रलंबित निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करा,असे निर्देश दिले.प्रसंगी निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशिन्स उपलब्धता,बोर्ड परीक्षा आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेबाबत अडचणी स्पष्ट करताच सर्वोच्च न्यायालयाने बोर्ड परीक्षेचे कारण फेटाळून लावत प्रभाग रचना ३१ ऑक्टोंबर २०२५ पर्यंत पूर्ण करा आणि ईव्हीएम मशिन्सचा पुरवठा नोव्हेंबर २०२५ पर्यंत उपलब्ध करण्याचे आदेश दिल्याने जानेवारी २०२६ पर्यंत निवडणुकांचा बार फुटणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!