Thursday, September 24, 2026
Homeमूलवृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करण्यास नकार देणाऱ्या मुलांना आता चपराक…

वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करण्यास नकार देणाऱ्या मुलांना आता चपराक…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मूल(चंद्रपूर) :- वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करण्यास नकार देणाऱ्या मुलांना आता चपराक बसणार असून,शासनाची याकडे करडी नजर आहे.

मागील वर्षी अशाच एका प्रकरणात मुलाला चपराक बसली आहे.मूल तालुक्यातील राजोली येथील भास्कर दामोधर ठिकरे यांनी आईचा सांभाळ करण्यास नकार दिल्यानंतर उपविभागीय अधिकारी मूल यांच्याकडे १७ नोव्हेंबर २०२२ रोजी केलेल्या तक्रारीनुसार संबंधित मुलाला दरमहा ३ हजार रुपये देण्याचा आदेश २५ जानेवारी २०२३ रोजी तत्कालीन उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी दिला होता.यावरून आई- वडिलांचा सांभाळ न करणाऱ्यांना आता शासनाची चपराक बसणार आहे. विशेष म्हणजे,चंद्रपूर जिल्ह्यातील हे पहिलेच प्रकरण असल्याचे म्हटले जात आहे.शासनाने ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरण तथा उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आई वडील आणि ज्येष्ठ पालक तथा नागरिक देखभाल आणि कल्याण कायदा २००७ चे कलम ५ अन्वये आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या व्यक्तीला त्यांच्या उपजीविकेसाठी दरमहा रक्कम त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत बघून देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

मूल तालुक्यातील राजोली येथील वच्छलाबाई दामोधर ठिकरे यांनी आई-वडील ज्येष्ठ पालक तथा नागरिक देखभाल आणि कल्याण कायदा २००७ अन्वये अर्ज दाखल केला.यावर उपविभागीय अधिकारी मूल यांनी वेळोवेळी सर्वांचे मत नोंदवले. गैरअर्जदार मुलगा भास्कर दामोधर ठिकरे याला प्रतिमाह ३ हजार रुपये ५ तारखेच्या आत जमा करण्याचा आदेश २५ जानेवारी २०२३ रोजी दिला. तसेच राहत्या घरातील दोन खोल्यांचा ताबा तसेच औषधोपचाराकरिता दवाखान्यात घेऊन जाणे व त्यासाठी येणारा पूर्ण खर्च करण्यात यावा.त्यात कसूर केल्यास कायदेशीर कारवाईस पात्र राहतील,असेही बजावले.अर्जदाराला मानसिक व शारीरिक त्रास देण्यात येऊ नये; असेही आदेशात नमूद करण्यात आले.या आदेशाने ज्येष्ठ नागरिकांचा सांभाळ करण्यास भावी युवा पिढी पुढे आली तरच समाजातील चित्र बदलेल व आई-वडिलांची हेळसांड करणाऱ्यांना आळा बसेल.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डुंबरसात्या आणण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गावालगतच्या जंगल परिसरात 'डुंबरसात्या' म्हणजेच मशरूम आणण्यासाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार २४ सप्टेंबर रोजी...

कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील रिक्त कोतवाल पद भरण्यास शासनाची मान्यता.. – महिला आरक्षण व रिक्त पदे भरण्याकरिता जातीचा प्रवर्ग निश्चित करण्यासाठी विशेष सभा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील गेल्या अनेक कालावधीपासून रिक्त असलेले कोतवाल(महसुल सेवक)पद भरण्यास शासनाने मान्यता दिली असून संबंधित गावातील...

कृषी विभागातील तब्बल १४ हजार ४४५ तांत्रिक अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून दुष्काळग्रस्तांना एक दिवसांचे वेतन..

उद्रेक न्युज वृत्त :-निसर्गाच्या लहरीपणाचा नेहमीच शेतकरी बांधवांना फटका सहन करावा लागतो आहे. कधी अवकाळी पाऊस,तर कधी किडीचा प्रादुर्भाव,तर कधी ऐन हंगामात धो-धो पावसामुळे...

सायबर फसवणूक टाळण्यासाठी डिजिटल व्यवहारात सतर्कता आवश्यक- इंटर-ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टीमचे राज्य समन्वयक संजय त्रिपाठी – अनोळखी लिंक,संदेश अथवा आमिषांना प्रतिसाद देण्यापूर्वी त्यांची खातरजमा...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डिजिटल व्यवहार आणि सोशल मीडियाचा वापर वाढत असतांना सायबर गुन्ह्यांच्या पद्धतीही बदलत आहेत.ऑनलाइन आर्थिक फसवणूक आणि वैयक्तिक माहितीच्या गैरवापरापासून स्वतःचे संरक्षण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!