- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-बऱ्याच कालावधीपासून पडीक असलेल्या जागेतील विहिरीत एक हात आणि डोका नसलेला मानवी सांगाडा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.सदरची घटना आज,शनिवार ३० ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास गणेशपेठ हद्दीतील आग्याराम देवी मंदिराच्या काही अंतरावर असलेल्या परिसरात उघडकीस आली.नागपूरच्या सिव्हिल लाइन्स परिसरात वास्तव्यास असणारे देवेश प्रकाश सूचक यांच्या मालकीची जागा आग्याराम देवी मंदिराच्या काही अंतरावर असून यापूर्वी त्या ठिकाणी जिनिंग मिल होती.सदरची जिनिंग मिल काही कारणास्तव बंद पडल्याने देवेश सूचक यांनी २००८ मध्ये दिनेश सूचक यांना संपूर्ण जागा विकली होती.बऱ्याच कालावधीपासून जागा पडीक असल्याने आज शनिवारी दिनेश सूचक यांच्या कुटुंबियांकडून परिसरातील जागेची साफसफाई करणे सुरू असतांनाच आवारात असलेल्या विहिरीतून दुर्गंधी येऊ लागली. विहिरीत डोकावून बघितले असता मानवी सांगाड्यासारखे दिसून आल्याने याबाबत गणेशपेठ पोलिसांना माहिती देण्यात आली.त्यानुसार पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होत अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले.अग्निशमन दलाच्या मदतीने अज्ञात व्यक्तीचा मानवी सांगाडा बाहेर काढण्यात आला.बाहेर काढण्यात आलेल्या सांगाड्याचा एक हात आणि डोका नसल्याने चर्चेला उधाण आले आहे.सदरचा सांगाडा कुणाचा,कोणी मारून फेकला व किती दिवसांपासून त्या ठिकाणी होता,त्यासाठी फॉरेन्सिक पथकास पाचारण करून त्या दिशेने तपास सुरू आहे.
- Advertisement -

