Sunday, May 24, 2026
Homeगडचिरोलीविविध कार्यालयातील शासकीय वाहनांचा वापर खाजगी कामाकरिता - लॉग बुकच्या नोंदीमध्ये केला...

विविध कार्यालयातील शासकीय वाहनांचा वापर खाजगी कामाकरिता – लॉग बुकच्या नोंदीमध्ये केला जातो ताळमेळ

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली:- जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील  अधिकारी,कर्मचारी व इतर पेंडूलम आपल्या घरगुती व खाजगी कामाकरीता शासकीय वाहनांचा वापर करीत असल्याची चर्चा सर्वसामान्य जनतेच्या वाणीतून गुंजू लागली आहे.

जील्ह्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर विविध सरकारी कार्यालये असून,प्रत्येक विभागातील कार्यालयांना शासनाने ‘महाराष्ट्र शासन’ या नावाने चारचाकी वाहन उपलब्ध करून दिले आहेत.उपलब्ध करून दिलेली वाहने ही खाजगी कामांव्यतिरिक्त इतर शासकीय कामांसाठी आहेत.मात्र काही अधिकारी,विभाग प्रमुख कार्यालये सोडुन इतर वरिष्ठ अधिकारी व कार्यालयातील विभाग प्रमुख हे कार्यालयातील शासकीय वाहनांचा वापर खासगी कामाकरिता वापरत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

खाजगी कामामध्ये वाहनांच्या समोर व मागील बाजूस ‘महाराष्ट्र शासन’ असलेल्या नावाची पाटी लावुन स्वगावी जाणे,लग्न समारंभास जाणे,विविध प्रकारच्या कार्यक्रमास हजेरी लावणे व इतर अशा बऱ्याच खाजगी कामाकरिता शासकीय वाहन उपयोगात आणले जात आहे.काही अधिकारी व कर्मचारी चक्क बिअर बार मध्ये सुद्धा अंधाराचा फायदा घेऊन वाहन नेत असतात.

खासगी कामाकरिता नेलेल्या वाहनांचा ताळमेळ केल्या जातो.यात प्रामुख्याने सुरुवातीला एका कच्या नोटबुकावर नोंदी घेतल्या जातात व नंतर कच्या बुकातील नोंदींची ताळमेळ करून पक्क्या लॉगबुकवर नोंदी घेतल्या जातात.खाजगी कामात वापरले जाणारे वाहन सुट्टीच्या दिवसातील वा इतर दिवसातील वेगवेगळ्या स्वरूपाचे दौरे दाखवून लॉगबुकवर नोंदी घेतल्या जातात.यामुळे ही बाब कुणाच्याही लक्षात येत नसल्याने सर्रासपणे व राजरोसपणे शासकीय वाहनांचा वापर खासगी कामाकरिता केला जातो आहे.शासकीय वाहन खाजगी कामांकरिता नसून ते कार्यालयीन वापरा करिता असल्याने त्याचा वापर केवळ शासकीय कामात केला गेला पाहिजे.

यावर त्वरित आळा बसण्याकरिता शासनाने ठोस पावले  उचलून,अशा प्रकारांवर निर्बंध घातले पाहिजे.अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याचा बनाव; बालविवाहात सरकारी पाहुण्यांची एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह २० वर्षीय तरुणासोबत लावल्या जात असल्याची माहिती नागपूर जिल्हा बालसंरक्षण कक्षाला प्राप्त होताच पथकाने अल्पवयीन मुलीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!