Wednesday, August 19, 2026
Homeमुंबईविद्यमान आमदारांच्या पीए व वाहनचालकांच्या मानधनात वाढ..

विद्यमान आमदारांच्या पीए व वाहनचालकांच्या मानधनात वाढ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-राज्याच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या विद्यमान आमदारांचे स्वीय सहाय्यक म्हणजेच पीए आणि वाहनचालकांच्या मानधनात दहा हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.सदरची वाढ ही चालू महिन्याच्या १ ऑगस्ट २०२६ पासून लागू करण्यात आल्याचे संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.राज्य सरकारच्या निर्णयानुसार आता विद्यमान आमदारांच्या पीएंचे मासिक मानधन ३० हजार रुपयांवरून ४० हजार रुपये,तर वाहनचालकांचे मासिक मानधन २० हजार रुपयांवरून ३० हजार रुपये झाले आहे.जवळपास ४ वर्षानंतर सदरची मानधनवाढ करण्यात आली आहे.संसदीय कार्य विभागाने मानधनवाढीबाबतचा शासन निर्णय काल मंगळवारी जारी केला.महाराष्ट्र विधानमंडळ सदस्यांचे वेतन आणि भत्ते अधिनियम,१९५६ मधील तरतुदींनुसार विधानमंडळाच्या विद्यमान सदस्यांना त्यांचे विधिमंडळाचे प्रशासकीय कामकाज अधिक परिणामकारकपणे पार पाडण्यासाठी पीएची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. विधानमंडळ सदस्यांच्या वेतन आणि भत्ते संयुक्त समितीच्या शिफारशीनुसार पीएच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता. त्यानुसार,मानधन वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खुद्द पत्नीनेच प्रियकर दिराच्या मदतीने पतीचा काढला काटा.. -अनैतिक संबंधाचा बिन भाड्याच्या खोलीत ‘दी एंड’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-अनैतिक संबंधात आडकाठी येणाऱ्या पतीचा खुद्द पत्नीनेच प्रियकर चुलत दिराच्या मदतीने काटा काढल्याची घटना वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील वडनेर पोलिस ठाण्याच्या...

सावधगिरी बाळगा..! नागरिकांनी कोणत्याही अनोळखी लोन किंवा ट्रेडिंग ॲपवर विश्वास ठेवू नये..

उद्रेक न्युज वृत्त :-अल्पावधीत ट्रेडिंगच्या माध्यमातून लखपती करण्याचे तसेच तात्काळ कर्ज देण्याचे आमिष दाखवून अनधिकृत डिजिटल लेंडिंग ॲप्स आणि संशयास्पद कंपन्यांकडून नागरिकांची आर्थिक फसवणूक...

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित.. आता सर्पदंशाची प्रत्येक घटना,विषप्रतिबंधक लसीचा साठा,केलेले उपचार व मृत्यूची नोंद करणे बंधनकारक..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात...

अज्ञात चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; पतीचा मृत्यू,पत्नी गंभीर जखमी.. – देसाईगंज-आरमोरी मार्गावरील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज-आरमोरी मार्गावर जणूकाही अपघातांच्या मालिकांचे सत्र सुरू झाले की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.नुकताच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ रोजी देसाईगंज-आरमोरी मार्गावरील कुरुड...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!