Friday, September 11, 2026
Homeगडचिरोलीवाळू डेपोचा गोरखधंदा; रेतीची रॉयल्टी ३ ब्रासची तर रेतीची वाहतूक १५ ब्रासची..

वाळू डेपोचा गोरखधंदा; रेतीची रॉयल्टी ३ ब्रासची तर रेतीची वाहतूक १५ ब्रासची..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-वाळू तस्करीला आळा बसावा आणि नागरिकांना स्वस्त दरात वाळू उपलब्ध व्हावी,या उद्देशाने शासनाने वाळू डेपो पद्धती सुरू केली.वाळू हवी असल्यास आधी ऑनलाईन बुकिंग करायची. त्यानंतर डेपोमधून वाळूची उचल करायची.या डेपो पद्धतीमुळे वाळू चोरी थांबेल,असा शासनकर्त्यांचा समज होता.मात्र,त्यांचा हा समज पूर्णतः फोल ठरला आहे. ट्रकमध्ये ५ ते १५ ब्रासपर्यंत वाळू भरली जाते. मात्र,चालकाला रॉयल्टी केवळ २ ते ३ ब्रासचीच देण्यात येते.नाव न लिहिण्याच्या अटीवर काही कार्यकर्त्यांनी सांगितले की,काही डेपो चालक वेगवेगळ्या व्यक्तीच्या आधारकार्डची मदत घेऊन स्वतःच वाळूची ऑनलाईन बुकिंग करतात.त्यामुळे एखादा ग्राहक डेपोचे नाव टाकून ऑनलाईन बुकिंग करण्याचा प्रयत्न करतो,तेव्हा त्याला बुकिंग फुल्ल झाल्याचे आढळून येते.काही डेपोची बुकिंग मध्यरात्रीला सुरू होऊन दोन-तीन तासांच्या अवधीतच बंद केली जाते.या दोन-तीन तासांच्या अवधीत डेपो चालक बोगस नावाने वाळूची बुकिंग करतात.वाळू डेपोमधून रॉयल्टीपेक्षा कितीतरी पटीने अधिक वाळू उपसा करून ती नागपूर,वर्धा, अमरावती व इतर जिल्ह्यात नेऊन विकण्याचा गोरखधंदा सुरू आहे.रेतीचा उपसा ही काही नवीन बाब नाही.मात्र, यातून रोज कोट्यवधीचा महसूल बुडत आहे.दुसरीकडे काही डेपो चालक व त्यांना मदत करणारे अधिकारी मालामाल होत आहेत.हा सर्व प्रकार थांबवून दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा...

ऐन सणाच्या दिवशीच दुर्दैवी घटना..! आयशर ट्रक आणि ट्रॅक्सचा भीषण अपघात; आठ जणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-ऐन तान्हा पोळा सणाच्या दिवशीच भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.आज,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!