Tuesday, September 8, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तलैंगिक इच्छा पत्नीकडे नाही तर कोणाकडे व्यक्त करणार?... -हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप...

लैंगिक इच्छा पत्नीकडे नाही तर कोणाकडे व्यक्त करणार?… -हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप उच्च न्यायालयाने फेटाळला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सभ्य समाजातील व्यक्ती लैंगिक इच्छा पत्नीकडे नाही तर कोणाकडे व्यक्त करणार? असा सवाल करत इलाहाबाद उच्च न्यायालयाने एका पतीच्या विरोधातील हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप फेटाळून लावला.पतीविरोधात महिलेने केलेले आरोप निराधार व वैयक्तिक वादातून प्रेरित असल्याचे नमूद करत पत्नी पीडित व्यक्तीला कोर्टाने दिलासा दिला.
या तक्रारीत पत्नीकडून सादर करण्यात आलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबातून हुंड्यासाठी छळ केल्याच्या दाव्याचे समर्थन होत नसल्याचे नमूद करत उच्च न्यायालयाचे न्या.कुमार गुप्ता यांनी प्रकरणातील प्रांजल शुक्ला आणि इतर दोन आरोपींविरोधातील याचिका फेटाळून लावली.
नैतिकदृष्ट्या सुसंस्कृत समाजातील पुरुषाने लैंगिक इच्छा पत्नीकडे व पत्नीने तिच्या लैंगिक इच्छा पतीकडे व्यक्त केल्या नाहीत तर ते कुठे जाणार? असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला.प्रांजल शुक्लाविरोधात पत्नीने हुंड्यासाठी शिवीगाळ व अश्लील चित्रपट पाहणे,अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप केले होते.मात्र,विश्वासार्ह पुराव्यांमधून पत्नीने केलेले आरोप सिद्ध होत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.तक्रारीतील आरोप जोडप्याच्या लैंगिक संबंधातील नकाराशी निगडित असून,हुंड्याच्या मागणीशी त्याचा काहीही संबंध नसल्याचे न्यायालयाला आढळले.लैंगिक संबंध न ठेवण्याबद्दल वादामुळे ही तक्रार दाखल केली आहे. त्यात हुंड्याच्या मागणीबाबत खोटे आणि बिनबुडाचे आरोप केल्याचे कोर्टाला आढळले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू,तर सात जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा परिसरात एका भरधाव ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार...

शासकीय शुल्काव्यतिरिक अतिरिक्त रकमेची मागणी; केवळ १५० रुपये घेतांना सेतू केंद्र चालकाला रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागरिकांना वेळेत व तात्काळ शासकीय प्रमाणपत्रे मिळावीत,यासाठी ऑनलाईन सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.मात्र,काही सेतू केंद्र चालक मनमानी कारभार करून शासकीय...

गावाजवळच दर्जेदार शिक्षण; चार शाळा बनणार ‘मॉडेल शाळा’..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासीबहुल आणि दुर्गम एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांना गावाजवळच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील चार शाळा ‘मॉडेल शाळा’...

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!