Saturday, June 20, 2026
Homeनागपूरलेखी परीक्षेदरम्यान गैरप्रकार करणारे १३ उमेदवार अपात्र घोषित... - तीन पोलीस कर्मचारी...

लेखी परीक्षेदरम्यान गैरप्रकार करणारे १३ उमेदवार अपात्र घोषित… – तीन पोलीस कर्मचारी निलंबित…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-शहर पोलिस दलाच्या भरती प्रक्रियेंतर्गत झालेल्या लेखी परीक्षेदरम्यान गैरप्रकार करणाऱ्या १३ उमेदवारांना पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी अपात्र घोषित केले आहे.याच प्रकरणात पोलिस आयुक्तांनी एका उपनिरीक्षकासह २ कर्मचाऱ्यांना पूर्वीच निलंबित केले आहे.पोलिस कर्मचाऱ्यांवरील कारवाईनंतर गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांवरील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले होते.पोलिस आयुक्त सिंगल यांनी गैरप्रकार करणाऱ्या १३ उमेदवारांना प्रक्रियेतून बाद करण्यात आले आहे.शहर पोलिस दलाकडून शिपाई प्रवर्गातील ३४७ पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे.त्यासाठी एकूण २९९८७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.कोणताही गैरप्रकार होऊ नये; याची काळजी पूर्वीपासूनच घेतली जात आहे.१६०० मीटर धावणे,शॉटपुट आणि पुलअप्ससह प्रत्येक चरणात बायोमेट्रिक पद्धतीने उमेदवारांची हजेरी घेण्यात आली. शारीरिक चारणीची प्रक्रिया शिस्तबद्ध स्वरूपात पार पडल्यानंतर २८ जुलैला यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजीनियरिंग (वायसीसीई) आणि दत्ता मेघे मेडिकल कॉलेज वानाडोंगरी येथे लेखी परीक्षा घेण्यात आली.त्याच्या आदल्या दिवशीच २७ जुलैला परीक्षा प्रक्रियेसाठी नियुक्त पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीरक्षेदरम्यान कोणतीही हयगय केल्यास कारवाईचा इशारा दिला होता.यानंतरही वायसीसीई कॉलेजच्या रूम नं. एससी ३-११ मधील उमेदवारांनी कॉपी केली. एकमेकांना प्रश्नांची उत्तरे विचारण्यासोबतच दुसऱ्याचे पेपर पाहून आपला पेपर सोडविण्यात आला.
परीक्षा केंद्रावर तैनात विशेष शाखेचे पोलिस उपनिरीक्षक संजय चव्हाण,गिट्टीखदान ठाण्याचा हेडकॉस्टेबल संतोष ब्रिजलाल फर्कंडे आणि जरीपटका ठाण्यातील कांस्टेबल सिद्धार्थ भोजराज लोखंडे यांनी गैरप्रकाराबाबत बघ्याची भूमिका घेतली. या प्रकारावरून याच केंद्रातील अन्य उमेदवार नाराज होते.त्यातील एकाने इमेलद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार करीत कारवाईची मागणी केली.पोलिस आयुक्तांनी तक्रार आणि झालेला प्रकार गांभीर्याने घेत अधिकाऱ्यांना केंद्रावरील फुटेज पडताळण्याचे आदेश दिले.त्यातून दोषी कर्मचाऱ्यांची तसेच गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांची माहिती समोर आली.
फुटेजच्या आधारे प्रत्येक टेबलवर रोल नंबरच्या आधारे गैरप्रकार करणाऱ्यांची ओळख झाली.पोलिस आयुक्त सिंगल यांनी सांगितले की,संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकतेने पार पाडण्यासाठी सर्व केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असल्याची खातरजमा करण्यात आली होती.तक्रारीनंतर कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले.केवळ एकाच केंद्रात आक्षेपार्ह प्रकार घडल्याचे समोर आले.गैरप्रकार करताना दिसणाऱ्या उमेदवारांच्या उत्तर पत्रिकाही तपासल्या.त्यांना चांगले गुणही होते.पण,त्यामुळे प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांवर अन्याय झाला असता.यामुळे १३ उमेदवारांना बाहेर करण्यात आले.यात आर्थिक व्यवहार झाला नसला तरी दुर्लक्षामुळे पोलिस दलाची प्रतीमा मलीन झाली.यामुळे तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माहिती अधिकार कायद्यातील बदलांवर नाराजी; अण्णा उतरणार मैदानात.. – माहिती न देणाऱ्या चोरट्यांचे काय?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या आठवड्यात एक राजपत्र काढून माहिती अधिकार कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत.शासनाने १२ जून २०२६ रोजी माहिती...

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून...

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!