Friday, May 22, 2026
Homeनागपूररोजगार सेवकांच्या मागण्या मान्य न केल्यास उद्यापासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा.....

रोजगार सेवकांच्या मागण्या मान्य न केल्यास उद्यापासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा.. – रोजगार हमी योजनेच्या आयुक्तांना निवेदन सादर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी ग्रामीण रोजगार हमी योजनेचे आयुक्त रवींद्र ठाकरे यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. शासनाने रोजगार सेवकांच्या मागण्या मान्य न केल्यास उद्या,मंगळवार १ एप्रिलपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
ग्राम रोजगार सेवकांचे पदनाम बदलून ग्राम रोजगार सहाय्यक करण्यात आले.तसेच एकत्रित मानधन, एकत्रित प्रवास भत्ता ३ ऑक्टोंबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार १ ऑक्टोंबर २०२४ पासून लागू झाला. या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आयुक्त नागपूर यांनी २१ ऑक्टोंबर २०२४ व १९ मार्च २०२५ ला मानधन वितरणाबाबत मार्गदर्शन मागविले आहे.परंतु अजूनही राज्य शासनाकडून मार्गदर्शन करण्यात आले नाही.मागील सहा महिन्यांपासून ग्राम रोजगार सेवक, सहाय्यकांना मानधन न मिळाल्यामुळे त्यांच्यावर हलाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे.या विषयाची गंभीरता लक्षात घेता शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी,अन्यथा ३१ मार्च २०२५ पर्यंत ग्राम रोजगार सेवक यांच्या मानधन वितरण प्रक्रियेबाबत अंमलबजावणी न झाल्यास १ एप्रिलपासून राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल व शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत चालू असलेल्या अपूर्ण कामांमध्ये हयगय व नुकसान झाल्यास सर्व जबाबदारी शासनाची राहील,असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतांना ग्राम रोजगार सेवक संघटनेचे महासचिव राजेंद्र जिचकार,उपाध्यक्ष वासुदेव गोतमारे, राहुल शेंडे,धीरज अंजनकर,रामगोपाल ढोबळे,मिलिंद मांगे,राहुल गजभिये,राहुल चिमोटे,श्याम डाखोळे, रामेश्वर शेटे आदी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल ४३४ रिक्त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन.. – पदांनुसार मासिक वेतन मिळणार १६ हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता...

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांना मिळणार राष्ट्रीय स्तरावरील गौरव.. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत सन-२०२७ साठी दिल्या जाणाऱ्या ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’साठी अर्ज मागविण्यात आले आहेत.शिक्षण,कला,सांस्कृतिक कार्य,क्रीडा, नाविन्यपूर्ण शोध,सामाजिक...

अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज,शुक्रवार २२ एप्रिल रोजी भीषण अपघाताची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली.विरूध्द दिशेने भरधाव वेगात असलेल्या एका अज्ञात...

प्रलंबित बिल आणि नवीन काम देण्यासाठी दोन टक्के दराने मागितले ७० हजार.. -जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कामाचे प्रलंबित असलेले बिल काढून देण्यासाठी व नवीन काही कामे तुम्हालाच देणार म्हणून दोन टक्के प्रमाणे ७० हजाराची लाचेची मागणी करणाऱ्या जलसंपदा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!